बहुजन हिताय संघ (BHS) व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) यांची संयुक्त बैठक दिनांक २१ जून २०२६ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर आयटी पार्क हॉल, खराडी, चंदननगर, पुणे येथे सकाळी १०.०० ते ५.०० या वेळेत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली.
बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. रत्नाकर गायकवाड सर (I.A.S.), माजी मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, उपस्थित होते. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने पतसंस्था स्थापन करणे, कॅडर डेव्हलपमेंट तसेच “ग्राहक ते उपभोक्ता” या संकल्पनेवर आधारित ट्रेडिंग व्यवसायाच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी BHS व MRAAKA यांच्यात परस्पर सहकार्य व भागीदारीची घोषणा करण्यात आली. या भागीदारीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व रोजगाराभिमुख विविध विकासात्मक उपक्रम संयुक्तपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय लोणावळा जाहीरनामा (Declaration) संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून मा. डॉ. सादिक पटेल सर (गुणश्री प्राध्यापक, जे. जे. हॉस्पिटल, मुंबई), मा. आजिज शेख (IAS), माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे, मा. सी.डी.फकीर, माजी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मा. एम. टी. कांबळे , माजी शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका पुणे , मा.रज्जाक शेख, माजी कुल सचिव, व अध्यक्ष, पी.ए.इनामदार शिक्षण संस्था, तसेच मा. हाजी जतकर, माजी राज्यकर सह आयुक्त तथा संस्थापक अध्यक्ष, MRAAKA) उपस्थित होते.
मान्यवरांनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघटनात्मक एकजूट, शिक्षण, रोजगार निर्मिती आणि आर्थिक सक्षमीकरण यांचे महत्त्व अधोरेखित केले.
लोणावळा जाहीरनाम्यातील सात सूत्री कार्यक्रम व त्या अनुषंगाने चर्चा व उपाययोजना सखोलपणे विस्तृत करण्यात आल्या.
लोणावळा येथे मांडण्यात आलेल्या सात सूत्री कार्यक्रमाच्या अवलोकन, अभ्यास व प्रभावी अंमलबजावणीसाठी BHS व MRAAKA कटिबद्ध असल्याचे अध्यक्षांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
१. पतसंस्था व सहकारी बँकांमार्फत ₹५००० कोटी ठेवींचे उद्दिष्ट साध्य करणे.
२. युवक-युवतींसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे.
३. ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी क्लस्टर विकास दृष्टिकोन स्वीकारणे.
४. दलित /बहुजन व मुस्लिम महिलांसाठी बचत गटांची स्थापना व सक्षमीकरण.
५. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तयारीची प्रभावी व्यवस्था उभारणे.
६. “आझम कॅम्पस पॅटर्न”च्या धर्तीवर केजी ते पीजी शिक्षण साखळी विकसित करणे.
७. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक कॅडर विकसित करणे.
अध्यक्षांनी नमूद केले की, या सात सूत्रांच्या माध्यमातून आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व रोजगाराभिमुख विकासाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी BHS व MRAAKA सर्वतोपरी प्रयत्न करतील.
बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक व फलदायी चर्चा होऊन भविष्यातील उपक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
दुपारच्या सत्रात
मा. अजिज शेख साहेब (IAS): त्यांच्या यशस्वी सेवापूर्तीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव मा. रत्नाकर गायकवाड साहेब (IAS) यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला .
मा. इमतियाज भाई शेख, नामवंत उद्योगपती यांनी महत्त्वपूर्ण बैठकीसाठी (Meeting) जागा उपलब्ध करून देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
श्रीमती संगीता आठवले, सामाजिक विचारवंत, यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करणेत आला.
आहिशा शेख, वकिलीची पदवी, यशस्वीपणे प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मा. हिरामण गायकवाड चार्टर्ड अकाऊंटट यांचा ५० वा वाढदिवसही सर्वांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला व त्याचा सत्कार करणेत आला. प्रशासकीय सेवापूर्ती, शैक्षणिक यश, सामाजिक सहकार्य आणि वाढदिवस अशा वेगवेगळ्या आनंदाच्या क्षणांचा हा एक सुंदर क्षण होता.
या बैठकीमध्ये अनेक सामाजिक विचारवंत उपस्थित होते त्यांनी दलित /बहुजन व अल्पसंख्याक संकल्पनेबद्दल आपले मोलाचे विचार मांडले.
बहुजन हिताय संघ (BHS) चे व
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) चे खालील पदाधिकारी उपस्थित होते.
मा.रामचंद्र जाधव, माजी उप शिक्षण संचालक, मा.मोहम्मद युसुफ निशानदार , माजी कार्यकारी अभियंता, सिडको, मा. नजीर शेख, माजी राज्यकर उपायुक्त,
मा. यासिन मापारा – अधीक्षक अभियंता (विद्युत), सिडको, मा.डॉ. प्रफुल्ल बनसोडे, माजी उप संचालक, कृषि मा. नासिरअहमद बिराजदार – से.नि. कार्यकारी अभियंता (अवि), मा.जान मोहम्मद पठाण, सहायक पोलिस आयुक्त, निलेश म. माईणकर – संचालक – डी.व्ही.एम.पी, सलीमपाशा शेख – राज्यकर उपायुक्त, सदानंद कांबळे – व्यवसायीक, सौ. संगीता आठवले – सामाजिक कार्यकर्त्या, आप्पासा पांढरे – पोस्टमन, दिलशाद खान – संशोधक (रिसर्चर), शेख झेड. एच. – प्राध्यापक , हमीद मुलाणी – आर.एन.टी. शिक्षक, मेहरुद्दीन गु. शेख , विभाग प्रमुख, पत्रकार सुतार अस्लम इब्राहिम तालुका अध्यक्ष, नॅशनल बहुजन समाज,
शफिक शेख, सामाजिक विचारवंत सूरज कुळकर्णी , मुख्याध्यापक (निवृत्त) शेख सलीम हैदर , सिद्धार्थ नामदेव कांबळे उद्योगपती, मिलिंद ऍडव्होकेट प्रभाकर ओव्हाळ , वकील, हिरामण एम. गायकवाड – चार्टर्ड अकाउंटंट , शेख इब्राहिम आफिफ – इ.डी.आय. सेवानिवृत्त, पी.एस. जामखेड, विलासराव दोरगे सामाजिक विचारवंत, विलास दोरगे
मानिकराव सातव सामाजिक विचारवंत,
एकनाथ शिंदे सामाजिक विचारवंत, महमदहनिफ के. जतकर , कर सहाय्यक, इकबाल अन्सारी – अध्यक्ष, मुस्लिम ओ.बी.सी.शेख आयेशा – मतीन मुजावर वकील , तौहीद अन्सारी , शमसुद्दीन शेख – सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त बी.एस.एन.एल. अधिकारी, एस. ए. खान, सामाजिक कार्यकर्ते , प्रो. भांबर एस. जी. अहमद नगररियाज नदाफ , सायबर एक्सपर्ट, ऍडव्होकेट अपेक्षा पवार , डी. एस. दिवेकर – ऑफिस अधीक्षक, वाजीद ए. मुजावर , सामाजिक, अखलाक अहमद शेख , शिक्षक व समुपदेशक , आलीहैदर शेख, सरकारी अधिकारी, गौस इनामदार , वरिष्ठ लिपिक शाकिर पटेल अब्दुल्लाह शेख , नवयुग निर्माण समिती, शोएब मुजावर, नवयुग निर्माण समिती , ऍडव्होकेट लतिफ बादशहा सुभेदार , सेवानिवृत्त , श्री. अब्दुल रझाक मुल्ला – विस्तार अधिकारी, जि. प. पुणे, कौसर सय्यद – व्यापारी , खालिद रिझवान , उद्योगपती, आय. एम. पटेल – व्यवसाय , आर. आय. मुल्ला – व्यावसायिक (प्रोफेशनल), सानिया – आशिया एस. शेख – शिक्षिका, पठाण सानिया अलिजान ,- विद्यार्थी (फार्मसिस्ट), अस्फिया अलिजान पठाण – प्रोजेक्ट असिस्टंट (एन.सी.एल. मध्ये), शेख मुदस्सूर एम. – कृषी अधिकारी, मुस्तफा तांबोळी – शिक्षक (मार्गदर्शक), असद सर , शिक्षक (जे.ई.ई.) (एन.डी.ए.), सुल्तान हमजू शेख – अग्रीकल्चर इंजिनिअरिंग, गुलाब अलार , सेवानिवृत्त, दानिश मतीन देशमुख , असे एकूण ९० वरिष्ठ अधिकारी , शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक विचारवंत , उद्योगपती, कायदे सल्लागार, व इतर क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.
बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व उपस्थित मान्यवरांनी संघटनांच्या कार्यास पूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
ही बैठक यशस्वी होण्यासाठी श्री.नासिर बिराजदार, श्री.जानमोहम्मद पठाण, डॉ. शमीम शेख, श्री.अब्दुल रझाक मुल्ला यांनी खूप परिश्रम घेतले.
आभार प्रदर्शन श्री. अब्दुल रजाक मुल्ला यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
” शिक्षण, संघटन, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक समतेच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास” हा बैठकीचा मुख्य संदेश ठरला .