Event

हज कमिटी ऑफ इंडिया (HCOI) व महारष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) यांच्या संयुक्त विद्यमाने हज हाऊस, मुंबई येथे मुस्लिम तरुणासाठी एम.पी.एस.सी.च्या स्पर्धा परीक्षेसाठी वर्ग सुरू करणार.
डॉ. मकसूद खान, सी.ई. ओ.,केंद्रीय हज कमिटी व असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक.

हज कमिटी ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( M.P.S.C.) मार्फत मुस्लिम समाजातील होतकरू व हुशार विद्यार्थ्यासठी स्पर्धा परीक्षेसाठी हज हाऊस मुंबई येथे वर्ग सुरू करण्यासंदर्भात दिनांक २७ ऑगस्ट २०२० रोजी हज हाऊस येथे मा. डॉ. मकसूद खान साहेब यांच्या मार्गदर्शनखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीची सुरुवात तीलावत ए कुराण ने झाली.
सर्वप्रथम मा. डॉ. मकसूद खान साहेब यांना हज कमिटी ऑफ इंडियाच्या सी.ई.ओ.या पदावर एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्याबद्दल असोसिएशन तर्फे बुके देऊन अभिनंदन करण्यात आले.

मा. डॉ. मकसूद खान साहेब यांनी एक विशाल दृष्टिकोन ( Broad Vision ) ठेऊन नवी मुंबई येथे हज कमिटी ऑफ इंडिया साठी सिडको कडे जागेची मागणी केली होती त्यास अनुसरून सिडको येथे कार्यरत अधिकारी व असोसिएशनचे पदाधिकारी श्री लालमिया शेख, श्री मोहमाद युसुफ निशानदार, श्री यासीन मापरा यांनी सिडको मध्ये सकारात्मक पाठपुरावा करून ३००० स्क्वे.मीटर (अंदाजे पाऊण एकर) जागेचे मान्यता पत्र असोसिएशनचे अध्यक्ष श्री हाजी जतकर यांच्या हस्ते मा. डाॅ. मकसूद खान साहेब यांना या बैठकीमध्ये सर्वांच्या उपस्थितीत सुपूर्द केले. याप्रसंगी सिडको मधील कार्यतत्पर अधिकाऱ्यांचे कौतुक करताना मा. मकसूद खान साहेब यांनी सिडकोचे उंबरठे न झिजवता हे पत्र मिळाले असून असोसिएशनच्या व्यासपीठावर एकत्र येण्याने असे कार्य घडू शकतात अशी प्रंशसा केली.

 

एम .पी.एस.सी चे (राज्यसेवा, वनसेवा, आर. टी. ओ.निरीक्षक , राज्यकर निरीक्षक, पोलिस उपनिरिक्षक ई. ) वर्ग हज हाऊस येथे सुरू करण्याबाबत मा. डॉ. मकसूद खान साहेब हे अत्यंत सकारात्मक असून त्यासाठी विद्यार्थ्यांना राहण्याची, ग्रंथालय सुविधा व पुस्तके उपलब्ध करून देण्याची पूर्ण तयारी मा.महोदय यांनी दर्शविली. असोसिएशनने उमेदवारांची खाण्याची, गेस्ट लेक्चर व समन्वयाची भूमिका घ्यावी ,त्याचबरोबर नियोजन करून जे उमेदवार सर्वप्रथम एम.पी.एस.सी.ची राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले असतील त्यांना शोधून या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रवेश दिल्यास चांगले रिझल्ट पहावयास मिळतील असे सांगितले मात्र त्यासाठी लागणारा निधी असोसिएशनने सर्व सभासदांना आवाहन करून जमवावा व त्यासाठी बँकेमध्ये वेगळे खाते काढावे जेणेकरून जकात व देणगी या दोन्ही माध्यमातून निधी गोळा करता येईल.
याशिवाय मा. डाॅ. मकसूद खान साहेब यांनी पूर्ण मार्गदर्शन व सहकार्य करण्याबरोबर हा सामाजिक बांधिलकीचा व समाजाला दिशा देऊन सक्षम करणारा प्रकल्प कसा यशस्वी होईल याकडे पूर्ण लक्ष देण्याचे मान्य केले.

असोसिएशनचे उपस्थित पदाधिकारी यांनीसुद्धा चर्चेत भाग घेताना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पव्यवस्थापना बाबत व बऱ्याच मुद्यावर प्रकाश टाकला व अशा समाजाच्या भल्यासाठी मा. डॉ.खान साहेब पुढाकार घेत असतील तर असोसिएशनच्या माध्यमातून आपणही त्यांच्या या चांगल्या उपक्रमामध्ये सकारात्मक रित्या सामील होण्यासाठी होकार दर्शवीत भविष्यात एक आदर्श पॅटर्न ( IDEAL PATTERN ) समाजासाठी अस्तित्वात येईल असा आशावाद व्यक्त केला व त्यासाठी नियोजन करून पुढील रणनीती ठरविण्याचे निश्चित झाले.

भविष्यात मुस्लिम समाजातील हुशार तरुण प्रशासनात येण्यासाठी हे व्यासपीठ दिशा देणारे ठरेल व महाराष्ट्रात एक मोठी स्पर्धा परीक्षा अकॅडमी अस्तित्वात येईल. मात्र, या संकल्पनेमध्ये असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी, सभासद,
समाजप्रेमी व्यक्ती, दानशूर व्यक्ती, उद्योगपती या सर्वांनी Service to the Society is Service to the Nation या तत्त्वास अनुसरून सहभागी होणे गरजेचे आहे व त्या दिशेने आपल्याला काम करावे लागेल यावर बैठकीमध्ये एकमत होऊन पुढील दिशा ठरवण्याचे निश्चित झाले.

या बैठकीमध्ये श्री हाजी जतकर, राज्यकर उपायुक्त (अध्यक्ष), श्री मोहमद युसुफ निशानदार ,तत्कालीन कार्यकारी अभियंता ,सिडको (उपाध्यक्ष), श्री अशफाक शेख, सहायक नगररचना संचालक (सरचिटणीस ), श्री नजीर शेख, राज्यकर उपायुक्त (चिटणीस ), श्री यासीन मापारा,कार्यकारी अभियंता,सिडको (चिटणीस ), श्री दस्तगीर मुल्ला,राजपत्रित स्टेनो (खजिनदार), श्री लियाकत शेख, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री मोहम्मद आरिफ, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री.अखलाक शेख,पदवीधर शिक्षक (सदस्य), श्री.असिफ सय्यद, कर सहाय्यक (सदस्य ),श्री हसन खान, लिपिक,बी.एम.सी.(सदस्य) हे उपस्थित होते.
यशियाव हज हाऊस येथे एम.पी.एस.सी. परिक्षेसाठी तयारी करणारे श्री मुजमिल सय्यद,श्री शहाबाज मणियार, श्री.मुजीब शेख श्री. ताऊसिफ देशमुख यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली जेणेकरून सद्यस्थितीत यावर उपाय शोधण्यासाठी मदत होईल.

शेवटी श्री नजीर शेख यांनी ही बैठक आयोजित केल्याबद्दल मा. डॉ. मकसूद खान साहेबांचे व उपस्थितांचे आभार मानले.

August 31, 2020

MPSC Guidance Meeting By MRAAKA

हज कमिटी ऑफ इंडिया (HCOI) व महारष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) यांच्या संयुक्त विद्यमाने हज हाऊस, मुंबई येथे मुस्लिम तरुणासाठी एम.पी.एस.सी.च्या स्पर्धा परीक्षेसाठी वर्ग […]
August 4, 2020

मा.संजय कुमार साहेब (आय.ए. एस.) मुख्य सचिव अभिनंदन

संजय कुमार साहेब (आय.ए. एस.) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांची मुख्य सचिव या पदावर नियुक्ती झाल्यामुळे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. बुके व असोसिएशनची मार्गदर्शक […]
July 22, 2019

Selected UPSC New Candidates Felicitated By MARRAKA

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग ( यू. पी. एस. सी.) तर्फे निवड झालेले खालील उमेदवार असोसिएशन च्या कार्यालयात आलेले होते त्यावेळी त्यांचा शाल, बुके व असोसिएशन ची डायरी देऊन सत्कार करणेत आला.
June 29, 2019

Bearers Felicited – पदाधिकारियों ने सत्कार किया

Maharashtra Rajya Alpasankhyak Adhikari Karmachari Association (MRAAKA) bearers felicited to HON’BLE MUKHTAR ABBAS NAQVI SIR, Minority Affairs Minister, Govt.Of India , on the occasion of Felicitation […]