श्री.नजीर शेख साहेब, राज्यकर उपायुक्त (जी.एस. टी.), (MRAAKA) तर्फे निवृत्ती प्रित्यर्थ शाल व बुके देऊन सत्कार

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) तर्फे श्री.नजीर शेख साहेब, राज्यकर उपायुक्त (जी.एस. टी.) व असोसिएशनचे चिटणीस यांच्या निवृत्ती प्रित्यर्थ शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला व निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

सर्वप्रथम श्री.नजीर शेख साहेब यांचे यशस्वी सेवानिवृत्ती बद्दल अभिनंदन करण्यात आले व निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदाचे, आरोग्याचे, सुख समाधानाचे व भरभराटीचे जावो अशी अल्लाह चरणी प्रार्थना करणेत आली.

या सत्कार प्रसंगी मा.आमदार कपिल पाटील साहेब, मुस्लिम व वंचितांचे नेते , मा.डॉ. सादिक पटेल साहेब, गुणश्री प्राध्यापक व असोसिएशनचे मुख्य आश्रयदाता, मा.एजाज नकवी साहेब, माजी संचालक, लेखा व कोषागारे व असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक, मा.डॉ. मकसूद खान साहेब, माजी सी.ई. ओ.हज कमिटी ऑफ इंडिया व असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक, मा. नसीर कादरी साहेब, संचालक, महापारेषण , व असोसिएशनचे मार्गदर्शक, मा.अब्दुल रौफ वहाब साहेब, माजी सहायक विक्रीकर आयुक्त, व असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक, ऍडव्होकेट सलीम पटेल साहेब, असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक यांची विशेष उपस्थिती होती.

मा.आमदार कपिल पाटील साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,मुस्लिम समाजातील अधिकारी व कर्मचारी यांनी समाजाचे प्रश्न सोडविण्याबरोबर जे समाजाचे प्रश्न सोडवितात त्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

मा.डॉ.सादिक पटेल साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन अल्पसंख्याक समाजातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

या सत्कार प्रसंगी श्री.हाजी जतकर, राज्यकर उपायुक्त, वरिष्ठ श्रेणी (अध्यक्ष), श्री. अजीज शेख साहेब,आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका (उपाध्यक्ष), श्री मोहम्मद युसुफ निशाणदार माजी कार्यकारी अभियंता, सिडको (उपाध्यक्ष), श्री.अश्फाक शेख, माजी सहायक संचालक, नगर रचना (सरचिटणीस), श्री. सैफुन शेख, उप वनसंरक्षक (चिटणीस), श्री.यासीन मापारा, कार्यकारी अभियंता, सिडको (चिटणीस), श्री. सुहेल खान, माजी कार्यकारी अभियंता, सिडको (सह खजिनदार ), डॉ.पीरसाब अत्तार, विभागप्रमुख (सदस्य), श्री.दस्तगीर मुल्ला, राजपत्रित स्टेनो (खजिनदार ), श्री. कय्यूम कुरेशी, माजी विक्रीकर अधिकारी (सदस्य), श्री.इम्रान मुजावर, राज्यकर अधिकारी (सह खजिनदार), श्री.मेहमूद शेख , प्राचार्य (सह खाजिनदार), श्री. सैफुल्लाह खान, उद्योगपती (हितचिंतक), श्री. अफजलभाई शेख, उद्योगपती (हितचिंतक), श्री. मोहम्मद आरीफ, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री. असिफ सय्यद, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री. जुबेर सय्यद, राज्यकर निरीक्षक (सदय), श्री.अखलाख शेख, शिक्षक (सदस्य), श्री.राजाभाऊ कांदळकर,सामाजिक विचारवंत, (हितचिंतक), हे उपस्थित होते.