Selected UPSC New Candidates Felicitated By MARRAKA

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग ( यू. पी. एस. सी.) तर्फे निवड झालेले खालील उमेदवार असोसिएशन च्या कार्यालयात आलेले होते त्यावेळी त्यांचा शाल, बुके व असोसिएशन ची डायरी देऊन सत्कार करणेत आला.

१) *श्री रियाझ अहमद सय्यद साहेब* , आय.ए. एस साठी निवड (२६१ रँक ).
२) *श्री. नवजीवन पवार साहेब*, आय.ए. एस.साठी निवड ( ३१६ रँक ).
३) *श्री. जयेश आहिरे साहेब*, आय.आर.एस साठी निवड ( ४५९ रँक ).

वरील गुणवंत उमेदवार जे जेष्ठ अधिकारी म्हणून प्रशासनात लवकरच आपल्या कामाचा ठसा उमटवणार आहेत ज्यांनी सामाजिक बांधिलकी जपून आपल्या असोसिएशनच्या कार्यालयात आले व असोसिएशनला या गुणवंत उमेदवारांचा सत्कार करण्याची संधी अससोसिएशनला प्राप्त झाली, त्यामुळे असोसिएशन निश्चितच या गुणवंत उमेदवारांची आभारी आहे.

या गुणवंत उमेदवारांनी असोसिएशन च्या कामाबद्दल प्रशंसा व्यक्त करून अससोसिएशन च्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीला मार्गदर्शन करण्याचे व नैतिक पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी श्री हाजी जतकर, राज्यकर उपायुक्त (अध्यक्ष), श्री नजीर शेख, राज्यकर उपायुक्त ( सह खजिनदार ), श्री. मेहबूब कासार, राज्यकर उपायुक्त (सह चिटणीस ), श्री.इम्रान मुजावर, राज्यकर अधिकारी ( सह खजिनदार ) श्री. मोहम्मद आरिफ, राज्यकर निरीक्षक (सदस्य ), श्री. असिफ सय्यद, कर सहाय्यक (सदस्य ) हे उपस्थित होते.