जकात देऊन समाजाचे ऋण फेडा ( आवाहन )

हज कमिटी ऑफ इंडिया (HCOI) व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन

(MRAAKA) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( M.P.S.C.) मार्फत मुस्लिम समाजातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यासठी स्पर्धा परीक्षेसाठी हज हाऊस मुंबई येथे वर्ग सुरू करण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून मा. डॉ. मकसूद खान साहेब,सी.ई. ओ.,हज कमिटी ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनखाली व असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या समन्वयाने हे वर्ग चालविण्यात येतील.

या मिशन साठी जाहिरात देणेत आली होती त्यास अनुसरून २१९८ उमेदवारांनी अर्ज केले होते . यातील ११०४ उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली व त्यातून गुणा नुसार १७३ उमेदवारांच्या ५ पॅनल द्वारे दिनांक १३/०४/२०२१ व १४/०४/२०२१ या दोन दिवसात मुलाखती घेतल्या असून त्यातून हुशार व होतकरू असे ३० उमेदवार निवडले जाणार असून १० उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( एम .पी.एस.सी ) चे राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, परिवहनउमेदवार ई. ) वर्ग हज हाऊस येथे सुरू करण्याबाबत मा. डॉ. मकसूद खान साहेब हे अत्यंत सकारात्मक असून त्यासाठी विद्यार्थ्यांना राहण्याची, ग्रंथालय सुविधा व पुस्तके उपलब्ध करून देण्याची पूर्ण तयारी मा.महोदय यांनी दर्शविली आहे. असोसिएशनने उमेदवारांची खाण्याची, गेस्ट लेक्चर व समन्वयाची भूमिका स्वीकारली असून होतकरू व हुशार उमेदवार यामध्ये निवडले जाणार आहेत जेणेकरून चांगले रिझल्ट पहावयास मिळतील, मात्र त्यासाठी लागणारा निधी असोसिएशनने सर्व सभासदांना आवाहन करून बऱ्यापैकी जमविला असून त्यासाठी बँकेमध्ये वेगळे खाते काढलेले आहे, यामध्ये जकात व देणगी या दोन्ही माध्यमातून निधी घेता येईल.
याशिवाय मा. डाॅ. मकसूद खान साहेब यांनी पूर्ण मार्गदर्शन व सहकार्य करण्याबरोबर हा सामाजिक बांधिलकीचा व समाजाला दिशा देऊन सक्षम करणारा प्रकल्प कसा यशस्वी होईल याकडे पूर्ण लक्ष देण्याचे मान्य केले आहे.

भविष्यात मुस्लिम समाजातील हुशार व होतकरू तरुण प्रशासनात येण्यासाठी हे व्यासपीठ निश्चित दिशा देणारे ठरेल व महाराष्ट्रात एक मोठी स्पर्धा परीक्षा अकॅडमी अस्तित्वात येईल जी देशहीताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे, मात्र, या संकल्पनेमध्ये तन, मन, धन या भावनेतून असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी, सभासद,
समाजप्रेमी व्यक्ती, दानशूर व्यक्ती, उद्योगपती या सर्वांनी Service to the Society is Service to the Nation या तत्त्वास अनुसरून सहभागी होणे गरजेचे आहे .

असोसिएशनचे अनेक पदाधिकारी यांनी सामाजिक बांधिलकी जपून जकात व देणगी देऊन मुस्लिम समाजातील हुशार व होतकरू तरुण प्रशासनात येणेसाठी एक आदर्श स्पर्धा परीक्षा अकॅडमी बनण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलेले आहे .

भविष्यात स्पर्धा परीक्षा अकॅडमी पुणे व औरंगाबाद येथे स्थापन करण्यात येणार असून या दोन्ही ठिकाणी दरवर्षी प्रत्येकी १०० असे एकूण २०० उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल व त्यासाठी निधीची आवश्यकता भासणार आहे.

मा. डॉ. मक्सूद खान साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार MRAAKA (Competative Exam and Education) या नावाने बँकेत वेगळे खाते काढलेले आहे,जेणेकरून जकात व देणगी या खात्यामध्ये जमा करता येईल.

सामाजिक बांधिलकी जपून देशहीत पाहणाऱ्या या उपक्रमामध्ये आपण जकात व देणगी देऊन सहभागी व्हा व या संकल्पनेचे साक्षीदार व्हा.

बॅँक खात्याचा तपशील.
——————————
Maharashtra Rajya Alpsankhyak Adhikari Karmchari Association.
MRAAKA ( Competative Exam and Education.)
Bank of Maharashtra, C.B.D.Belapur Branch, Navi Mumbai.
AC No.60366978011.
IFS Code :- MAHB0000890.

टीप :- १) या उपक्रमासाठी जकात व देणगीच्या माध्यमातून जमा होणारा निधी हा फक्त मुस्लिम समाजातील हुशार, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा व शिक्षण यासाठी वापरला जाईल.
२) जकात बँकेत जमा केल्यानंतर कृपया त्याचे तपशील श्री.नजीर शेख (9594335196) व श्री.दस्तगीर मुल्ला (8424044008 ) या नंबर वर व्हॉट्स अप करावेत जेणेकरून पावती देणे स सुलभ होईल.