महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) चा पुणे विभागीय दौरा, बैठक व ‘मराका डायरी २०२६-२७’ प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे येथील व्ही.आय.पी. सर्किट हाऊस येथे अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचारी असोसिएशनचे प्रेरणास्रोत, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव व माजी मुख्य माहिती आयुक्त आदरणीय श्री. रत्नाकर गायकवाड सर (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या शुभहस्ते असोसिएशनच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे तसेच ‘मराका डायरी २०२६-२७’ चे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआन पठणाने झाली. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानिक मूल्ये, बंधुता, समता आणि सामाजिक न्यायाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करण्यात आली.
आदरणीय रत्नाकर गायकवाड सर यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
१. मराक्काच्या प्रशिक्षण केंद्रातील गुणवंत विद्यार्थी
२. सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी
३. पदोन्नतीप्राप्त अधिकारी
४. उल्लेखनीय कार्य, गुणवत्तापूर्ण कामगिरी व सामाजिक योगदानाचा गौरव
समाजसेवा, शैक्षणिक क्षेत्र, प्रशासकीय सेवा, वैद्यकीय क्षेत्र, क्रीडा आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
सर्व सन्मानमूर्तींचे मराका च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
वाघोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन व मरक्काकडून सामाजिक प्रश्नांप्रती संवेदनशीलता, गरजू घटकांना मदतीचा हात म्हणून 25 हजार रुपयाचा धनादेश मा. जान मोहम्मद पठाण यांच्या हस्ते देण्यात आला आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही या सोहळ्याच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला.
सत्कार सोहळ्यानंतर आदरणीय रत्नाकर गायकवाड साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून मराक्काच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचे कौतुक केले आणि असोसिएशनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराका चे मुख्य आश्रयदाता मा. डॉ. सादिक पटेल सर, गुणश्री प्राध्यापक जे.जे. हॉस्पिटल, यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मराका च्या व्यासपीठावर एकत्र येऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले.
या बैठकीमध्ये मा.इफ्तिकार इनामदार साहेब, शिक्षण सम्राट, मा. अजीज कारचे साहेब, माजी आयुक्त, महानगर पालिका, मा.रझाक शेख, अध्यक्ष, पी. ए.इनामदार शिक्षण संस्था, मा.ॲड. रामकृष्ण मिसाळ हे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये दलित व अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्योगांची उभारणी, उद्योजकतेच्या संधी आणि आर्थिक विकासाच्या विविध मार्गांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मा. श्री. भगवानराव गवई साहेब, माजी महाव्यवस्थापक, HPCL व नामांकित उद्योगपती, दुबई, यांची विशेष उपस्थिती लाभली.
मराका चे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यकर सह आयुक्त मा. हाजी जतकर यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच भगवानराव गवई साहेब व त्यांच्या टीमने मराक्काच्या सदस्यांना उद्योग, व्यवसाय, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक विकासाच्या विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास राज्य समितीच्या वतीने अनेक वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये:
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा आणि वैचारिक समृद्धी प्राप्त झाली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बुलढाणा आणि लातूर यांसह १५ विविध जिल्ह्यांतील सुमारे १४० सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली.
यामध्ये मा. मसिउद्दीन सय्यद (माजी कार्यकारी अभियंता), मा. सय्यद शहीद (माजी परिवहन अधिकारी), मा. अतिक शेख (विभागप्रमुख), मा. डॉ. झाकीर खान (प्राध्यापक), मा. डॉ. एस. ए. एन. इनामदार (माजी ग्रंथपाल), मा. डॉ. महजबीन म्हैसाळे (प्रबंधक, शासकीय तंत्रनिकेतन), मा.शमीम सय्यद, डाटा पर्वेक्षक, मा. हसन निडोणी (मंडळ अधिकारी), मा. रियाज शेख (तलाठी), मा. चांद शेख (माजी पदवीधर शिक्षक) आणि मा. नासिर नाईक (आरोग्य पर्यवेक्षक) यांच्यासह विविध जिल्ह्यांतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
दुपारच्या भोजनानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पदाधिकारी व प्रतिनिधींनी विभागीय चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला.
या बैठकीत असोसिएशनच्या भविष्यातील वाटचालीसाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा व विचारमंथन करण्यात आले.
बैठकीतील प्रमुख विषय :
या चर्चासत्रामुळे विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व सदस्यांना आपले विचार मांडण्याची, अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी एकत्रित दिशा निश्चित करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली.
कार्यक्रमाचे प्रभावी व सुंदर सूत्रसंचालन मा. श्री. लतीफ शहा व मा. श्री. सूरज कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. श्री. इब्राहिम शेख यांनी केले.
राष्ट्रगीताने या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये पुणे जिल्ह्यातील मराका च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकजुटीने आणि समर्पित भावनेने मोलाचे योगदान दिले.
राष्ट्रपती पदक प्राप्त मा. श्री. जान मोहम्मद पठाण (मार्गदर्शक, पुणे जिल्हा), मराका चे जिल्हाध्यक्ष मा. श्री. नासिर बिराजदार, मराका चे उपाध्यक्ष मा. डॉ. शमीम शेख आणि मार्गदर्शक मा. श्री. इसरार पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली इव्हेंट मॅनेजमेंट टीमने अत्यंत उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधला.
या सर्व सहकाऱ्यांसह मराका च्या प्रत्येक सदस्याने कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन, पाहुण्यांचे स्वागत, नोंदणी, भोजन व्यवस्था, व्यासपीठाचे नियोजन, प्रसिद्धी आणि विविध जबाबदाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व संस्मरणीय ठरला.
विशेषतः पुणे जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी समजून घेत केलेले समर्पित कार्य, परस्पर सहकार्य आणि संघभावना ही या कार्यक्रमाच्या यशाची खरी ताकद ठरली. सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
मराका म्हणजे केवळ एक संघटना नव्हे, तर अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण, सामाजिक एकता, शैक्षणिक प्रगती, प्रशासकीय कार्यक्षमता, आर्थिक स्वावलंबन आणि सर्वसमावेशक विकासासाठी कार्यरत असलेले एक प्रेरणादायी व्यासपीठ आहे.
भारतीय राज्यघटनेतील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा अंगीकार करून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचा मराक्काचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.
चला, एकत्र येऊया… संघटित होऊया… समतेचा विचार रुजवूया… सामाजिक एकतेची भावना अधिक दृढ करूया… आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खांद्याला खांदा लावून योगदान देऊया!
सर्व मान्यवर, पदाधिकारी, सदस्य, सन्मानमूर्ती आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!