महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशनच शाखा सोलापूर ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
———————————————–
MRAAKA, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन शाखा सोलापूर ची वार्षिक सर्वसाधारण सभा , महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष तथा उपायुक्त राज्यकर महाराष्ट्र शासन श्री जतकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी संघटनेच्या वतीने MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झालेले विद्यार्थी, MBBS उत्तीर्ण विद्यार्थी, राष्ट्रीय स्तरापर्यंत यशस्वी खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक श्री अनिस खैरदी सर मांडले व संघटनेचे ध्येय , उद्देश याबद्दल माहिती सांगितली .तद्नंतर संघटनेचे माजी अध्यक्ष तथा सोलापूर कोषागार अधिकारी श्री सर्फराज मोमीन यांनी जिल्हा कार्यकारिणी आढावा घेतला व जिल्हा कार्यकारिणी तथा तालुका अध्यक्ष यांची नावे जाहीर करून , प्रमुख पाहुण्याच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
प्रमुख पाहुणे श्री सलीम शेख साहेब यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले व समाजसेवा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जतकर साहेब यांनी नूतन जिल्हा तथा तालुका कार्यकारिणी यांना शुभेच्छा दिल्या व संघटनेचे कार्य आणखी वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. फक्त अल्पसंख्याक कर्मचारी नाही तर संपूर्ण अल्पसंख्याक समाजाचा विकास होण्यासाठी संघटना पातळीवर काम करण्यासाठी उत्तेजित केले. अल्पसंख्याक समाजाचा इतिहास , शिक्षणाचे फायदे सांगून , सुशिक्षित पदवीधर युवकांसाठी UPSC तथा MPSC चे फ्री कोचिंग क्लास चलावण्याबाबत आवाहन केले. संघटनेच्या वतीने मुंबई येथे हाजी हाऊस मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असून त्यातून यावर्षी 13 अधिकारी घडल्याचे सांगितले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री इकबाल तडकल सरांनी केले तर आभार संघटनेचे विधी सल्लागार श्री जावेद खैरदी यांनी मानले.कार्यक्रम समारोपानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
जिल्हा कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे
????????????????????????????????????
नूतन जिल्हाध्यक्ष:- श्रीअनिस खैरदी उपअभियंता PWD
कार्याध्यक्ष- श्री इकबाल तांबोळी प्राचार्य सोशल कॉलेज
उपाध्यक्ष- श्री फिरोज मणेरी
पदवीधर शिक्षक
– श्री रियाज भाईजान
सर्कल ऑफिसर
सचिव – श्री इकबाल तडकल
– फार्मासिस्ट
सहसचिव-श्री अमजद इनामदार- शिक्षक
कोषाध्यक्ष- श्री अब्दुल्ला पानगल – शिक्षक नेते उर्दू संघटना
विधीसल्लागार- श्री जावेद खैरदी
विधि अधिकारी सोलापूर विद्यापीठ
जिल्हा महिला संघटक
1) उजमा दुरूगकर
2) शिरीन धाराशिवकर
संपर्क प्रमुख-कॅप्टन शफी शेख
????????????????????????????
नूतन तालुकाध्यक्ष पुढीलप्रमाणे
माळशिरस- श्री इरफान इनामदार – डायट वेळापूर
अक्कलकोट- श्री इस्माईल मुर्डी – केंद्रप्रमुख
मंगळवेढा-श्री अब्दुलसत्तर शेख – अभियंता बांधकाम
माढा- श्री लियाकत शेख
– ग्रामविकास अधिकारी
पंढरपूर-श्री जब्बार शिकलगर
जेष्ठ शिक्षक पंढरपूर
बार्शी- श्री पी एस शेख
शाखा अभियंता
मोहोळ- श्री जिलानी तांबोळी
-मुख्याध्यापक
उत्तर सोलापूर- श्री अफजल शेख – शिक्षक
दक्षिण सोलापूर-श्री मोहीम दुरुगकर -अभियंता
यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकरी अधिकारी श्री जावेद शेख साहेब , राज्याध्यक्ष जतकर साहेब , राज्यउपाध्यक्ष श्री सलीम शेख साहेब , राज्य तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य, जिल्ह्यातील कर्मचारी, आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा प्राचार्य सोशल कॉलेज श्री इकबाल तांबोळी सर व संघटनेच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.