MRAAKA 2022 Residential Coaching for MPSC State Service.

जकात देऊन समाजाचे ऋण फेडा ( आवाहन )
April 25, 2021
कर्तव्य भावनेतून जकात व देणगी देऊन आपल्या समाजाचे ऋण फेडा
April 10, 2022

MRAAKA 2022 Residential Coaching for MPSC State Service.

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) यांचे विद्यमाने अल्पसंख्याक समाजातील हुशार व होतकरू उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या राज्यसेवा परीक्षेसाठी (उप जिल्हाधिकारी, पोलिस उप अधीक्षक, सहकार उप निबंधक, सहा. राज्यकर आयुक्त, उप मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसिलदार ई.पदासाठी ) सन २०२२ या वर्षांकरिता निवासी कोचिंग

( सन २०२१ मधील निवासी प्रशिक्षणासाठी निवडलेल्या उमेदवारांपैकी ८ उमेदवार पोलीस उप निरीक्षक पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले असून राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये ४ उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत,अर्थातच अधिकारी घडविण्याची प्रक्रिया असोसिएशनतर्फे निरंतर सुरू राहील.)

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचारी असोसिएशन यांच्या विद्यमाने MPSC राज्यसेवा
परीक्षेची तयारी करणा-या अल्पसंख्याक समाजातील हुशार व होतकरू विघार्थांसाठी पुणे किंवा मुंबई येथे निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत.

➡️ कोर्सची वैशिष्ट्ये⬅️
——————————
– MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी दर्जेदार कोचिंग
– पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेसह मुलाखत परीक्षेचे परिपूर्ण मार्गदर्शन.
– टेस्ट सिरीज.
– हॉस्टेलची व्यवस्था.
– हॉस्टेलमध्ये जेवणाची व्यवस्था (ठराविक अटी व शर्ती सह )
– स्टडी मटेरियल.
-महाराष्ट्ररातील नामांकित प्राध्यापकांचे मार्गदर्शन.
– प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.

➡️ पात्रता⬅️
——————
– ज्या उमेदवाराने MPSC पूर्व परीक्षा दिली आहे व उत्तीर्ण होण्यासाठी सक्षम आहे किंवा ज्यामध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्याची क्षमता आहे तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
➡️ अर्ज करण्याची पध्दत⬅️
——————————
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर फॉर्म भरून नोंदणी करावी.
https://forms.gle/jpn8brt59xHM24Ky9