हुशार व होतकरू उमेदवारासाठी एम.पी एस सी.निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन तर्फे अल्पसंख्याक समाजातील हुशार व होतकरू उमेदवारासाठी एम.पी एस सी.निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू करणेबाबत जाहिरात देणेत आली होती त्यास अनुसरून पुणे येथे सदर वर्ग सुरू करणेचे निश्चित झाले असून असोसिएशनचे राज्य पदाधिकारी व पुणे जिल्हा पदाधिकारी यांची सखोल बैठक पुणे येथे रविवार दिनांक १९ जून २०२२ रोजी पार पडली. पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री नासिर बिराजदार साहेब यांनी घोरपडी, पुणे येथे बांधलेली वास्तू अतिशय उत्तम व सर्व सोयींनी युक्त असून या वास्तूमध्ये जुलै महिन्यापासून निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू होतील. त्याअगोदर १०० उमेदवारांची मुलाखत व त्यांचेकडे असलेली गुणवत्ता या निकषावर ३० उमेदवारासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.

या बैठकीमध्ये श्री.हाजी जतकर, राज्यकर उपायुक्त,वरीष्ठ श्रेणी (अध्यक्ष), श्री.नजीर शेख,राज्यकर उपायुक्त (चिटणीस), श्री.नासीर बिराजदार, माजी कार्यकारी अभियंता (चिटणीस व जिल्हाध्यक्ष, पुणे), श्री. जानमोहमद पठाण,माजी पोलिस आयुक्त (चिटणीस),श्री.गुलाम नबी शेख, शिधावाटप अधिकारी (चिटणीस), श्री. अब्दुलरज्जक मुल्ला, विस्तार अधिकारी (सदस्य), श्री. कय्युम दाखवे, मुख्याध्यापक (सह खजिनदार) हे उपस्थित होते.