मा.मोहम्मद हुसेन सय्यद सर IRS यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले

????????घोरपडी (पुणे) येथील निवासी प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना मा.मोहम्मद हुसेन सय्यद सर IRS यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले????????

मराक्का कडून चालवण्यात येत असलेल्या घोरपडी (पुणे) येथील निवासी प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना मा.मोहम्मद हुसेन सय्यद सर IRS यांनी विविध स्पर्धा परीक्षा मध्ये यशस्वी होण्याच्या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले.

मा. मोहम्मद हुसेन सय्यद सरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची पद्धती कशी असावी, दिनचर्या कशी असावी,नोट्स कश्या काढल्या जाव्यात, आपला पॉझिटिव्ह एटीट्यूड कसा असावा जेणेकरून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होणे सोपे जाईल याबाबतीत सखोल मार्गदर्शन केले.
स्वतःच्या उदाहरणावरून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील यश संपादन करता येते फक्त कठोर परिश्रम करण्याची तयारी व प्रचंड इच्छा शक्ती असणे आवश्यक असल्याचे सांगितले. मराक्का चे मार्गदर्शन व सहकार्य आपल्या यशामध्ये झाल्याचा उल्लेख केला.
विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नाचे अतिशय उत्तम रीतीने निरासन केले व भविष्यात काही अडचणी आल्यास किंवा काही मार्गदर्शन लागल्यास संपर्क साधण्यास देखील सांगितले आहे.

मा.मोहम्मद हुसेन सर यांचे स्वागत मराक्का पुणे चे अध्यक्ष मा. बिराजदार सर यांनी केले. मराक्का मार्गदर्शक मा. जान मोहम्मद पठाण सर यांनी मान्यवरांची ओळख करून देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सर्व विद्यार्थ्यांच्याकडून मा.मोहम्मद हुसेन सर,अलिशा मॅडम तसेच मराक्का टीम चे आभार मानण्यात आले