महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन तर्फे, . मा. श्रीमती आय. ए. कुंदन मॅडम (आय. ए. एस.) यांची *प्रधान सचिव, अल्पसंख्याक विभाग , मंत्रालय या पदावर नियुक्ती झाल्यामुळे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन अभिनंदन केले व मा.महोदया यांना यशस्वी वाटचालीबद्दल मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
अल्पसंख्याक विभागामध्ये अनेक समाजोपयोगी कामे प्रधान सचिव या नात्याने मार्गी लावून त्याचा फायदा समाजास मिळवून दिल्याबद्दल मा.महोदया यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
बुके व असोसिएशनची मार्गदर्शक पुस्तिका व डायरी मा. महोदया यांना देण्यात आली तसेच असोसिएशनचे उद्देश विशद केले.
याप्रसंगी मा.डॉ.डेव्हिड अल्वारीस साहेब, तांत्रिक न्यायाधीश, विक्रीकर नायाधिकरण (ज्येष्ठ उपाध्यक्ष) श्रीमती ऐनुल अत्तार मॅडम, माजी सह सचिव (मार्गदर्शिका ) व श्री हाजी जतकर , राज्यकर उपायुक्त , वरीष्ठ श्रेणी (अध्यक्ष ), श्री.मोईन ताशिलदार , उप सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग,मंत्रालय (सदस्य), श्री. मोहसीन बागवान, कक्ष अधिकारी, मंत्रालय (सदस्य), श्री.इम्रान नाईकवाडी, सहायक राज्यकर आयुक्त (सदस्य), श्रीमती तमन्ना नाईकवाडी, कक्ष अधिकारी, मंत्रालय (सदस्या) हे उपस्थित होते.