मा. श्री. इम्तियाज काझी साहेब यांचे यशस्वी सेवानिवृत्ती बद्दल अभिनंदन

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) तर्फे मा.श्री. इम्तियाज काझी साहेब, सह सचिव, मंत्रालय व असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक यांच्या निवृत्ती प्रित्यर्थ शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला व निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

सर्वप्रथम मा. श्री. इम्तियाज काझी साहेब यांचे यशस्वी सेवानिवृत्ती बद्दल अभिनंदन करण्यात आले व निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदाचे, आरोग्याचे, सुख समाधानाचे व भरभराटीचे जावो अशी अल्लाह चरणी प्रार्थना करणेत आली.

मा.इम्तियाज काझी साहेब यांची कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष अधिकारी अशी मंत्रालयात ओळख होती. शासनाच्या अनेक धोरणात्मक निर्णयामध्ये मा. साहेबांचा सहभाग होता याशिवाय सामाजिक बांधिलकी जपून अनेक अधिकाऱ्यांना व गरजू लोकांना मदत केली व यापुढेही करतील.

या सत्कार प्रसंगी मा.नसीमा शेख मॅडम, माजी सह सचिव, मंत्रालय व असोसिएशनच्या मुख्य मार्गदर्शिका या उपस्थित होत्या.

याशिवाय या प्रसंगी श्री.हाजी जतकर, राज्यकर उपायुक्त, वरिष्ठ श्रेणी (अध्यक्ष), श्री मोहम्मद युसुफ निशाणदार माजी कार्यकारी अभियंता, सिडको (उपाध्यक्ष), श्री.नजीर शेख, राज्यकर उपायुक्त (चिटणीस ), श्री. सुहेल खान, माजी कार्यकारी अभियंता, सिडको (सह खजिनदार ), डॉ.पीरसाब अत्तार, विभागप्रमुख (सदस्य), हे उपस्थित होते.