Happy Diapawali Greetings

सातारा विभाग

 

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशन जिल्हा सातारा तर्फे शुभ दिपावली निमित्त सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अजय कुमार बंसल साहेब यांचा मा. श्री. मिनाज मुल्ला साहेब, उपविभागीय अधिकारी (प्रांत) सातारा यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशन मार्गदर्शक पुस्तिका व डायरी 2022 – 2023 देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. फिरोज शेख (नोडल अधिकारी, स्मार्ट सातारा), श्री. अजीम शेख (कृषी विभाग सातारा), श्री. असलम मुल्ला (कृषी विभाग सातारा), श्री. वसीम शेख (कृषी विभाग सातारा), श्री. अतुल साळुंखे (कृषी विभाग सातारा), डॉ. मोमीन सातारा, श्री. अब्दुल सत्तार (जिल्हा परिषद सातारा) उपस्थित होते.

अमरावती विभाग

आज मराक्का अमरावती जिल्हा कडून अमरावतीतील मा. डॉ. केशव तुपे सर सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, मा. डॉ. अंजली देशमुख मैडम संचालिका, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती तसेच मराका सदस्य मा. इनामदार मैडम प्रभारी प्राचार्य, शासकिय फार्मसी कॉलेज,अमरावती यांची भेट घेऊन मराका डायरी व दिवाळी ग्रीटिंग भेट दिली.
आजच्या भेटीच्या कार्यक्रमासाठी मराका अमरावती जिल्हा उपाध्यक्ष मा. मोहम्मद अयाज अफसर सर, मराक्का अमरावती जिल्हा सरचिटणीस मा. डॉ. जाकीर खान सर व सदस्य मा. अजमतुल्लाह खान (शासकीय फार्मसी कॉलेज), मा. हमीद शेख सर, मा. डॉ. वडतकर सर (शासकीय तंत्रविद्यानिकेतन महाविद्यालय), मा. आमिद शाह सर (शासकीय अभयांत्रिकी महाविद्यालय) मा. रागीब खान, उपस्थित होते.

बीड  विभाग

आज मराक्का बीड जिल्हा कडून मा. रधाबिनोद शर्मा सर (IAS) जिल्हाधिकारी बीड व मा. श्री. नंदकुमार ठाकुर (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक, बीड. यांची भेट घेऊन मराक्का डायरी व दिवाळी ग्रीटिंग भेट देऊन शुभेच्छा दिल्या..

आजच्या भेटीच्या कार्यक्रमासाठी मराक्का बीड चे पदाधिकारी प्रा. सय्यद शफीयोदिन, प्रा. मोमीन राईसोदीन, इंजिनिअर मोमीन मुजम्मिल, आरोग्य सहायक मजीद शेख उपस्थित होते.