महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) तर्फे मार्गदर्शन

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) तर्फे मार्गदर्शन बैठक इस्लाम जिमखाना , मुंबई येथे गुरुवार दिनांक २९/०२/२०२४ रोजी आयोजित करणेत आली .

या मार्गदर्शन बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव व असोसिएशनचे प्रेरणास्रोत मा.रत्नाकर गायकवाड साहेब उपस्थित राहणार होते, काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाहीत मात्र, मा.साहेबांनी व्हिडिओ कॉलिंगचे माध्यमातून उपस्थित सर्वांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन करताना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हा आदर्श विचार आत्मसात करणे गरजेचे असून असोसिएशन (MRAAKA) व बहुजन हिताय संघ यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाची आखणी करून वाटचाल करूया असे सांगितले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी मुबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मा.न्यायमूर्ती अभय ठिपसे साहेब यांनी या बैठकीमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार देश चालत असून असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी असोसिएशनचे हितासाठी व सामाजिक कार्यासाठी कार्यरत राहावे असे सांगून नैतिक पाठबळ दिले.

राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक मा. कैसर खालिद साहेब (आय.पी.एस.) यांनी सखोल मार्गदर्शन करताना असोसिएशनने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवावेत असे सांगितले.

असोसिएशनचे मुख्य आश्रयदाता व गुणश्री प्राध्यापक मा.डॉ.सादिक पटेल साहेब यांनी असोसिएशनची यशस्वी वाटचाल संपूर्ण महाराष्ट्रात चालू असून अनेक उपक्रम घेवून सर्व समाजाला बरोबर घेऊन आम्ही जात आहोत असे सांगितले..

या कार्यक्रमामध्ये बहुजन हिताय संघाचे पदाधिकारी मा.विजय रणपिसे, ज्येष्ठ बँक अर्थशास्त्रज्ञ, मा.नागसेन सोनारे, मुख्य अभियंता, ओ. एन. जी. सी. , मा.उत्तमराव बोधवडे, माजी पोलिस उपायुक्त हे मार्गदर्शनासाठी आवरजून उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये मा.न्यायमूर्ती एस. ए.काझी, माजी अप्पर जिल्हा न्यायाधीश, मा. अझीझ शेख, आयुक्त, महानगरपालिका (ज्येष्ठ उपाध्यक्ष), मा.जावेद पाशा, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत, मा.नसीमा शेख, माजी सह सचिव, मंत्रालय (मार्गदर्शिका), मा.रिझवान अहमद (आय.आर.ई. एस,), अप्पर मुख्य अभियंता, रेल्वे, मा. नासीर मणेर (आय. आर.एस.) उपायुक्त जी.एस. टी, मा.सलमान शेख (आय.आर एस.) उपायुक्त कस्टम, मा.श्रीमती शबाना शेख, सहायक पोलिस आयुक्त , मा.सैफुल्ला खान, उद्योगपती, मा.डॉ. अस्लम बारी, माजी प्राचार्य, मा.रागिब अहमद, सामाजिक विचावांत, मा.डॉ.अमजद पठाण, कॅन्सर तज्ञ, मा.डॉ.खालिद शेख, नामवंत डॉक्टर हे उपस्थित राहून आपले विचार मांडले.

या बैठकीमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष व राज्यकर उपायुक्त (वरिष्ठ श्रेणी) श्री.हाजी जतकर यांनी असोसिएशनचे उद्देश विषद करताना राष्ट्रीय एकात्मता व मानवी मूल्यांचे संवर्धन हे असून असोसिएशनच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला व भविष्यात करण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल उपयुक्त उपाययोजना सांगितल्या.

या बैठकीमध्ये श्री. मोहम्मद रझा खान, उप संचालक, नगर रचना (उपाध्यक्ष), श्री.मोहम्मद युसुफ निशाणदार माजी कार्यकारी अभियंता, सिडको (उपाध्यक्ष), श्री.नजीर शेख, राज्यकर उपायुक्त (चिटणीस), श्री.यासीन मापारा, कार्यकारी अभियंता, सिडको (चिटणीस), श्री.सैफून शेख , उप वनसंरक्षक (चिटणीस), श्री.मोईनुद्दीन शेख, उप कुलसचिव, मुंबई विद्यापीठ (सदस्य),, श्री. सुहेल खान, माजी कार्यकारी अभियंता, सिडको (सह खजिनदार ), डॉ.पीरसाब अत्तार, विभागप्रमुख, व्हीं.जे टी.आय.(सदस्य), श्री.दस्तगीर मुल्ला, राजपत्रित स्टेनो, दिवाणी न्यायालय, (खजिनदार ), श्री.असिर शेख, सहायक राज्यकर आयुक्त (चिटणीस), श्री. मोईझ शेख, माजी उप आधीक्षक, बी.एम. सी.(सदस्य), श्री.नासीर खान,अधीक्षक, बी.एम.सी.(सदस्य),श्री.मोहसीन बागवान, कक्ष अधिकारी, मंत्रालय (सदस्य), श्री. जहीद शेख, राज्यकर अधिकारी (सदस्य), श्री.मेहमूद शेख , प्राचार्य (सह खाजिनदार), श्री. काय्यूम दाखवे , मुख्याध्यापक (सह खजिनदार), श्री.लियाकत शेख, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री. असिफ सय्यद, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री. जुबेर सय्यद, राज्यकर निरीक्षक (सदय),श्री.अजीम मुल्ला, माजी शिक्षक (सदस्य), श्री.अखलाख शेख, शिक्षक (सदस्य), श्री.इरफान बेलोसे, शिक्षक (सदस्य), श्री.गुलजार दळवी, शिक्षक (सदस्य), श्री.फारुख खाटीक, शिक्षक (सदस्य), श्री.मोहम्मद आफताब शेख, शिक्षक (सदस्य), श्री.तन्वीर मुजावर, लिपिक,मंत्रालय (सदस्य), श्री. गौस इनामदार, लिपिक (सदस्य), श्री.नौफिल सय्यद, सामाजिक विचारवंत , श्री.हुजफा पटेल, उद्योगपती, श्री.राजाभाऊ कांदळकर,सामाजिक विचारवंत, (हितचिंतक), श्री. अबिद मोहम्मद, सामाजिक विचारवंत,श्री. सुफियान खान, उद्योजक, श्री. माझ खाटीक, यांचेसह ६२ नामवंत, मान्यवर, अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.नजीर शेख यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले व आभार प्रदर्शन श्री.असिर शेख यांनी मांडले.

बैठकीची सांगता राष्ट्रगिताने करणेत आली.