Gaurav & Satkar Program (Rtd Judge Abhay Tipse Sir )

Mahiti Pustika And Diary 2017
January 29, 2017
Eid Milan Program
July 21, 2017

Gaurav & Satkar Program (Rtd Judge Abhay Tipse Sir )

*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तत्वे जपा. – श्री. रत्नाकर गायकवाड.*
*माणूस हाच धर्म व या देशातील घटना सर्वश्रेष्ठ – न्यायमूर्ती अभय ठिपसे.*
*महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशनच्या कार्यक्रमात प्रतिपादन*

दि. १० एप्रिल २०१७,

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशनतर्फे गौरव व सत्कार सोहळा कार्यक्रम दादरच्या स्काउट व गाईड हॉल येथे रविवार दि. ९ एप्रिल २०१७ रोजी पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी मुख्य सचिव व विद्यमान मुख्य माहिती आयुक्त मा. श्री. रत्नाकर गायकवाड हे उपस्थित होते. मा. न्यायमूर्ती अभय ठिपसे हे संपूर्ण कुटुंबासह या गौरव सोहळ्यास उपस्थित होते. या कार्यक्रमात मा. श्री. रत्नाकर गायकवाड व मा न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार व गौरव करण्यात आला.

सन्माननीय अतिथी म्हणून मा. श्री. रवींद्र चव्हाण, तत्कालीन संचालक, यशदा हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. सादिक पटेल, विभाग प्रमुख, जे. जे. हॉस्पिटल हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भक्तिगीताने झाली. या भक्ती गीताची मांडणी रायगडच्या शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे साकारली.

असोसिएशनचे अध्यक्ष श्री. हाजी जतकर, विक्रीकर उपायुक्त यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ या आदर्श विचारसरणीवर असोसिएशनची स्थापना झाल्याचे सांगून मा. श्री. रत्नाकर गायकवाड यांची प्रेरणा, मा. न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचा आधारस्तंभ पाठींबा मिळत असून शासन प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नैतिक पाठबळ व मार्गदर्शन मिळत असल्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात सदर असोसिएशनचे काम चालू असल्याचे सांगताना अल्पसंख्यांक समाजाला राष्ट्राचा मुख्य प्रवाहात आणण्याची प्रक्रिया शासनाच्या पाठबळाने संपूर्ण महाराष्ट्रात असोसिएशनच्या माध्यमातून सुरु झाल्याचे सांगितले.

मा. श्री. रत्नाकर गायकवाड हे असोसिएशनचे प्रेरणास्त्रोत असून या कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तत्वावर सर्वांनी वाटचाल केली तर आपला देश स्वयंपूर्ण व महासत्ता बनेल, असा आशावाद व्यक्त करताना त्यांनी असोसिएशनच्या वाटचालीबद्दल प्रशंसा केली.

गौरव मूर्ती या नात्याने बोलताना मा. न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी संपूर्ण न्यायदानाच्या कारकिर्दीत समोरची व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहून न्यायदान केलं. त्याचा धर्म कधीही पहिला नाही असे सांगताना आपल्या देशातील घटना सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगून या घटनेमुळेच भारतातील प्रत्येक व्यक्तीला अधिष्ठान व अधिकार प्राप्त झाल्याचे सांगितले.

सन्माननीय अतिथी मा. श्री. रवींद्र चव्हाण व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. सादिक पटेल यांनी असोसिएशनच्या वाटचालीबद्दलचे महत्व विषद केले व समाजाचे सक्षमीकरण होण्यासाठी असोसिएशनची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले.

असोसिएशनचे ब्रीदवाक्य “समतेसाठी एकत्र येऊ व सार्वभौम, धर्मनिरपेक्ष राष्ट्र घडवू” असे असल्याने देशहीत समोर ठेवून राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी सदर असोसिएशन अनेक उपक्रम व कार्यक्रम घेत असून सदरचा गौरव व सत्कार सोहळा हा त्याचाच एक भाग होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी यांच्या हितासाठी शासनाच्या पाठबळाने स्थापन झालेले भारतातील हे एकमेव व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठीसुद्धा दृष्टीकोन ठेवला जात आहे. तोच दृष्टीकोन ठेवून या कार्यक्रमामध्ये सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्री. अली एम. शम्शी (सामाजिक क्षेत्रातील रत्नदीप), श्री. नागसेन सोनारे (उत्कृष्ट समाजसेवक), सौ. विद्या अशोक सावखंडे (उत्कृष्ट समाजसेविका), श्री. सैफुल्ला खान (उत्कृष्ट समाजसेवक), श्री. मोहम्मद अफजल (उत्कृष्ट समाजसेवक), डॉ. सय्यद शफियोद्दिन (इस्त्रो शास्त्रज्ञ), मास्टर नुबेरशा सलीम शेख (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मास्टर),  श्री. समीर शेख (दिवाणी न्यायाधीश पदी निवड (वर्ग-१)), श्रीमती. अंजूम बानो पठाण (कक्ष अधिकारी पदी निवड), डॉ. रोशन जहाँ (शूर वीरांगना), डॉ. एस. ए. एन. इनामदार (उत्कृष्ट व सेवाभावी ग्रंथपाल), श्रीमती. मुमताज काझी (रेल्वे चालवणारी पहिली भारतीय महिला), श्री. आर. एफ. सय्यद (गुणवंत पशुवैद्यक), डॉ. सलमान मापारा (पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये इतर मागास प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम), श्री. हसन सिद्धनाथ (उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता) श्री. अकबर अली खान पठाण (मुख्य कायदा मार्गदर्शक), अॅड. अन्सार मिर्झा (मुख्य कायदा मार्गदर्शक) मास्टर मो. शफिक शेख (विशेष प्राविण्य) या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी असोसिएशनतर्फे “मार्गदर्शक पुस्तिका व डायरी २०१७” चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. अजीज शेख (उपायुक्त, महानगरपालिका), श्री. ताजदारखान पठाण (विक्रीकर उपायुक्त), श्री. सलीम शेख (कार्यकारी अभियंता), श्री. मो. युसुफ निशानदार (सहा. कार्यकारी अभियंता, सिडको), श्री. यासीन मापारा (सहा. कार्यकारी अभियंता, सिडको), श्री. सुहेल खान (सहा. कार्यकारी अभियंता, सिडको), श्री. अशफाक शेख (सहा. संचालक, नगररचना), श्री. नजीर शेख (विक्रीकर उपायुक्त), श्री. तन्वीर सय्यद (सहा. विक्रीकर आयुक्त), श्री. गुलामनबी शेख (शिधावाटप अशिकारी), श्री. दस्तगीर मुल्ला (राजपत्रित स्टेनो), श्री. मोहमद हानिफ फिरजादे (विक्रीकर अधिकारी), श्री. इम्रान मुजावर (विक्रीकर अधिकारी), श्री. मोईद शेख (उपअधीक्षक, बीएमसी), श्री. समीर प्रेरामपल्ली (सहा. अभियंता, सिडको) श्री. जाहिद अली शेख (विक्रीकर निरीक्षक), श्री. एन. जी. शेख (सर्व्हेअर, सिडको), श्री. सादिक शेख (विकास अशिकारी), श्री. रियाज शेख (तलाठी), श्री. फहीम कुरेशी (पर्यवेक्षक, बेस्ट), श्री. हसन सिद्धनाथ (मुख्याध्यापक), श्री. कय्युम दाखवे (मुख्याध्यापक), श्री. मेहमूद शेख (शिक्षक), श्री. गुलजार दळवी (शिक्षक), श्री. अखलाख शेख (शिक्षक), श्री. सय्यद इस्माईल (शिक्षक), श्री. सलीम मुलाणी (लेखा परीक्षक), श्री हैदर शेख (वरिष्ठ लिपिक), हसन खान (लिपिक), श्री. गौस मो. इनामदार, श्री. शहेनशाह पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती. वैशाली काकडे व श्री. सय्यद इस्माईल यांनी केले तर असोसिएशनचे सहचिटणीस श्री. यासीन मापारा, सहा. कार्यकारी अभियंता, सिडको यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमात शासन प्रशासनातील मान्यवर, विचारवंत व असोसिएशनचे संपूर्ण महाराष्ट्रातील अधिकारी, पदाधिकारी व सदस्य असे एकूण ३५० मान्यवर उपस्थित होते.