Eid Milan Program

Gaurav & Satkar Program (Rtd Judge Abhay Tipse Sir )
April 9, 2017
Sangathna Bandhni Meeting at Aurangabd on 16th September 2017
September 16, 2017

Eid Milan Program

*Dear Sir/Members*,
Maharashtra Rajya Alpasankhyak Adhikari Karmachari Association (MRAAKA) have organised the *EID MILAN* programme on 21st July 2017 (Friday) at *ISLAM GYMKHANA* (Dawat- E- Khaas hall), Marine Lines, Mumbai @ 7 p.m. onwards in the presence of following dignitaries.

*EMINENT GUEST*
(प्रमुख अतिथी)
Hon’ble Shyam Tagade.
(I.A.S.),
Principal Secretary,
Minority Affairs Ministry, Mantralaya.

*CHIEF GUEST*
( मुख्य अतिथी)
Hon’ble Bajirao Jadhav.
(I.A.S.),
Secretary, General Administration Dept.,(G.A.D.) Mantralaya.

*PRESIDENT OF PROGRAMME*.
Hon’ble Dr.Sadiq Patel ,
HOD, J.J.Hospital .

*GUESTS OF HONOUR*
1)Hon’ble Dr. M.A.Khan,
Registrar, Mumbai University.
2) Hon’ble Ajaj Nakvi,
Director, Accounts and Treasury.
3) Hon’ble Khalil Ansari,
Chief Engineer, Irrigation Dept.
4) Hon’ble Dr. Nagsen Ramraje,
HOD, J.J.Hospital.

*FELICITATION (सत्कारमूर्ति)* .
1) Hon’ble Faruk Darvesh,
(For his  Social and Business Achievement)
2) Hon’ble Nasir Maner,
( I.R.S.)
(For his selection in U.P.S.C.)
3) Hon’ble Dr.Amjad Pathan,
(For his Several Awards in  Cancer Research)
4) Kumar Nubairsha Salim Shaikh,
( Gold Medal Winner of Junior Chess in International Commonwealth Games.)

Your presence in this programme will be highly appreciable.

Pls make convenient to attend the programme in time.

*Note*
The Eid Milan programme will be followed by DINNER and SHIRKURMA.
_(Veg and Non Veg)_

Thanks and Regards
1)Haji Jatkar,
2)Dr.David Alwares.
3) Aziz Shaikh.
4)Md. Husen Mujawar.
5)Tajdarkhan Pathan.
6) Salim Shaikh.
7) Md. Yusuf Nishandar.
8) Nazir Shaikh.
(Programme Co-Ordinator)
9)Yasmin Molkar.
10)Marium Tadvi.
11)Salim Bagwan.
12)Ashfaq Shaikh.
13)Yasin Mapara.
14)Gulamnabi Shaikh
15)Suhail Khan.
16)Tanvir Sayyad.
17) Dastgir Mulla.
18) Md.Hanif Pirjade.
19) Imran Mujawar.
20) Anis Bagwan.
21) Moiz Shaikh
22) Jahid Shaikh.
23) Fahim Kureshi.
24) N. G. Shaikh.
25) Mehmood Shaikh.
26) Hasan Sidhnath.
27) Qayyum Dakhave
28)Salim Mulani.
29) Haider Shaikh.
30)Akhlaque Shaikh.
31) Hasan Khan.
32) Gaus Inamdar
33) Shahensha Patel.

*अल्पसंख्यांक समाजाच्या सक्षमीकरणासाठी व विकासासाठी शासन कटीबद्ध:*
*मा. श्री. श्याम तागडे साहेब, प्रधान सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र राज्य.*

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी-कर्मचारी असोसिएशनच्या वतीने या वर्षीचा ईद मिलन २०१७ चा कार्यक्रम २१ जुलै २०१७ रोजी इस्लाम जिमखाना, मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अल्पसंख्यांक विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव, मा. श्री. श्याम तागडे साहेब उपस्थित होते. सन्माननीय अतिथी म्हणून मा. डॉ. एम. ए. खान साहेब, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मा. श्री. एजाज नकवी साहेब, संचालक, लेखा व कोषागारे, मा. डॉ. नागसेन रामराजे साहेब, विभागप्रमुख जे.जे. रुग्णालय हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. सादिक पटेल साहेब, विभाग प्रमुख जे. जे. रुग्णालय हे होते. त्याशिवाय सत्कारमूर्ती म्हणून मा. श्री. मोहम्मद फारूक दरवेश साहेब (नामांकित उद्योगपती), मा. डॉ. अमजद पठाण साहेब (कॅन्सर संशोधक) श्री. नासीर मणेर (आय.आर. साठी निवडलेले अधिकारी), इंटरनॅशनल बुद्धीबळ मास्टर नूबैरशा शेख, (कॉमनवेल्थ ज्युनियर बुद्धीबळ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता), कुमार इरफान अहमद मो. युसूफ निशानदार (आंतरराष्ट्रीय तंत्र पूरस्कार विजेता हे आवर्जून उपस्थित होते.

मा.श्री. इम्तियाज काझी साहेब, सह सचिव, मंत्रालय, मा. श्री. संदेश तडवी साहेब, सह सचिव, मा. श्री. खालीद अरब साहेब, उपसचिव, मंत्रालय, मा. श्री. दिनेश सोनावणे साहेब, उप सचिव, मंत्रालय, मा. श्री. अशोक गायकवाड साहेब, अव्वर सचिव, मंत्रालय, मा. श्री. उदयसिंह चौहान साहेब, कक्ष अधिकारी, मंत्रालय यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास होती.

याप्रसंगी असोसिएशनतर्फे मान्यवरांचा शाल, स्मृतीचिन्ह व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अल्पसंख्यांक विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव मा. श्री. श्याम तागडे साहेब यांनी अल्पसंख्यांकासाठी असणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्येक घटकांसाठी देऊन त्यांचा विकास व सक्षमीकरण करण्यासाठी शासन सकारात्मक असून त्यांचे लाभ तळागाळात पोहोचवण्यासाठी स्वतः लक्ष घालून प्रभावीपणे अंमलबजावणी करीत असल्याचे सांगितले. शिवाय महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाच्या जमिनीपासून जास्तीत जास्त महसूल जमा करून तो निधी अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कसा वापरता येईल याचे नियोजन करीत असल्याचे सांगितले. या सर्व गोष्टी करण्यासाठी प्रत्येकामध्ये शासनास सहकार्य करण्यासाठी शिस्त अंगी आणावी लागेल याची आठवण करून दिली. संवैधानिक मूल्यांची जपणूक आपल्या सदस्यांमध्ये करण्यासाठी असोसिएशनने जे प्रयत्न आरंभिले आहेत ते कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांनी असोसिएशनच्या वाटचालीबद्दल प्रशंसा केली.

या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी मा. डॉ. एम. ए. खान साहेब, मा. श्री. एजाज नकवी साहेब, मा. डॉ. नागसेन रामराजे साहेब यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी असोसिएशनच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रशंसा केली व नेहमीच आपले योगदान देण्याचे आश्वासन दिले.

मा. डॉ. मकसूद खान तथा एम. ए. खान यांची केंद्रीय हज समितीवर सी.ई.ओ.पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये अल्पसंख्यांक समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी केंद्रीय हज समितीतर्फे विशेष तरतूद करण्यात येईल, असे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. सादिक पटेल साहेब यांनी आपल्या भाषणात शासन-प्रशासनातील अल्पसंख्यांक अधिकारी-कर्मचारी यांनी एकत्र येऊन अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. ज्यायोगे सक्षम भारत घडवून राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहण्यास मदत होईल. असे मत मांडले.

कार्यक्रमाची भूमिका विषद करताना असोसिएशनचे अध्यक्ष श्री. हाजी जतकर, विक्रिकर उपायुक्त यांनी सांगितले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या आदर्श विचारसरणीवर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशनची स्थापना महाराष्ट्रात झाली. या असोसिएशनला शासनाचे पाठबळ लाभले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अल्पसंख्यांक अधिकारी – कर्मचारी यांच्या हितासाठी शासनाच्या पाठबळाने काम करणारे देशातील हे एकमेव व्यासपीठ आहे. असोसिएशनचे ब्रीदवाक्य “समतेसाठी एकत्र येऊ आणि सार्वभौम व धर्मनिरपेक्ष राष्ट्र घडवू” असे असून या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही अनेक उद्देश अधोरेखित केले असताना देशहित समोर ठेवून या देशाची राष्ट्रीय एकात्मता कशी अबाधित राहील याकडे विशेष लक्ष देत आहोत. या व्यासपीठाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे अनेक उपक्रम राबविले असून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारसरणीवर संपूर्ण महाराष्ट्रात काम करीत असून आज महाराष्ट्रात ३० जिल्ह्यांमध्ये असोसिएशनचे काम सुरु आहे. असोसिएशनच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजातील अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी प्राप्त झाली आहे, असे सांगितले.

यावेळी असोसिएशनतर्फे मा. श्री. मोहमद फारूक दरवेश साहेब (सामाजिक क्षेत्रातील रत्नदीप व उत्कृष्ट सेवाभावी उद्योजक), मा. डॉ.  अमजद पठाण साहेब (राजीव गांधी एक्सलंस पुरस्कार, विजय रतन सुवर्णपदक, गोल्डन सिटीझन ऑफ इंडिया पुरस्कार, विभूषण सन्मान पुरस्कार), डॉ. श्री. नासीर मणेर (भारतीय राजस्व सेवा (आय. आर. एस.) साठी निवड), इंटरनॅशनल बुद्धीबळ मास्टर नुबैरशा सलिम शेख (कॉमनवेल्थ ज्युनियर बुद्धीबळ स्पर्धेत सुवर्णपदक विजेता), कुमार इरफान अहमद मो. युसूफ निशानदार (इंटरनॅशनल जरनल ऑफ नोव्हेल रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट पुरस्काराने सन्मानित) यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. श्याम तागडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

सत्कारमूर्ती मा. श्री. मोहम्मद फारूक दरवेश साहेब यांनी या व्यासपीठावर येऊन सत्कार स्विकारण्यास आनंद झाल्याचे सांगून असोसिएशनला आपला पूर्ण नैतिक पाठिंबा असल्याचे सांगितले. याशिवाय सदर असोसिएशन शासनाच्या पाठींब्याने निर्माण झाल्याने त्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे असे सांगितले.

याप्रसंगी असोसिएशनतर्फे मार्गदर्शक पुस्तिका व डायरी २०१७ च्या दुसऱ्या आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. अजीज शेख (उपायुक्त, महानगरपालिका), श्री. ताजदारखान पठाण (विक्रीकर उपायुक्त), श्री. सलीम शेख (कार्यकारी अभियंता, सा. बां. वि.), श्री. मो. युसुफ निशानदार (कार्यकारी अभियंता, सिडको), श्री. अशफाक शेख (सहा. संचालक, नगररचना),  श्री. यासीन मापारा (सहा. कार्यकारी अभियंता, सिडको), श्री. सुहेल खान (सहा. कार्यकारी अभियंता, सिडको), श्री. नजीर शेख (विक्रीकर उपायुक्त), श्री. तन्वीर सय्यद (सहा. विक्रीकर आयुक्त), श्री. गुलामनबी शेख (शिधावाटप अधिकारी), श्री. दस्तगीर मुल्ला (राजपत्रित स्टेनो),  श्री. मोहमद हानिफ पिरजादे (विक्रीकर अधिकारी), श्री. इम्रान मुजावर (विक्रीकर अधिकारी), श्री. मोईज शेख (उपअधीक्षक, बीएमसी), श्री. नासीर खान (विभाग निरीक्षक, बीएमसी), श्री. जाहिद अली शेख (विक्रीकर निरीक्षक), श्री. वहिद झारी (विक्रीकर निरीक्षक), श्री. सलीम मुलाणी (लेखा परीक्षक), श्री. फारूक खाटीक (पदवीधर शिक्षक), श्री. अखलाख शेख (शिक्षक), श्री. हैदर शेख (वरिष्ठ लिपिक), श्री. हसन खान (लिपिक, बीएमसी), श्री. शहेनशाह पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. नासीर खान (विभाग निरीक्षक, बीएमसी) व श्री. फारूक खाटीक (पदवीधर शिक्षक) यांनी अतिशय सुंदरपणे केले. असोसिएशनचे सह खजिनदार व विक्रीकर उपायुक्त श्री. नाजीर शेख यांनी आभार मानले.

शेवटी राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात शासन प्रशासनातील मान्यवर, विचारवंत व वेगवेगळ्या विभागातील असोसिएशनचे अधिकारी-पदाधिकारी व सदस्य असे एकूण १२० व्यक्ती उपस्थित होते.