महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन तर्फे मा.डॉ.पी. ए.इनामदार साहेब, अध्यक्ष, कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन ट्रस्ट यांना डॉ.पी. ए.इनामदार युनिव्हर्सिटी या नावाने महाराष्ट्रात मान्यता मिळाल्याने अभिनंदन करून शाल, बुके देऊन सत्कार करणेत आला व युनिव्हर्सिटीच्या यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ.पी. ए.इनामदार युनिव्हर्सिटी ही महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजासाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली एकमेव व पहिली युनिव्हर्सिटी असून या युनिव्हर्सिटीचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थांना सर्वागीण शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध होणार असून जिल्हा पातळी व तालुका पातळीवर या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कॉलेज काढता येतील व त्याचा फायदा समाजातील शिक्षणप्रेमी लोकांनी समाजाला करून दिला पाहिजे.
या भेटीच्या वेळी मा.इनामदार साहेब यांनी तब्बल १ तास विस्तृतपणे सखोल मार्गदर्शन केले व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व सक्षमीकरणासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाटी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशनने पुढाकार घेतला पाहिजे व आपल्या मार्गदर्शनासाठी व मदतीसाठी मी सदैव तयार आहे असा आत्मविश्वास देऊन उभारी देण्याचे संकेत दिले. याशिवाय या युनिव्हर्सिटी अंतर्गत महाराष्ट्रात कॉलेज व शैक्षणिक संस्थांचे जाळे या युनिव्हर्सिटीच्या मान्यतेने विणता येतील असे सांगितले.
या भेटीच्या वेळी मा.रवींद्र चव्हाण साहेब, माजी संचालक यशदा व असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक व मा.रझाक शेख साहेब , निबंधक, रंगूनवाला डेंटल कॉलेज व असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक यांची विशेष उपस्थिती होती.
याप्रसांगी श्री हाजी जतकर , राज्यकर उपायुक्त, वरीष्ठ श्रेणी ( अध्यक्ष), श्री. अजीज शेख, आयुक्त, महानगर पालिका (उपाध्यक्ष), श्री.जानमोहमद पठाण, माजी सहा.पोलिस आयुक्त (चिटणीस), श्री.असिर शेख, सहा.राज्यकर आयुक्त (चिटणीस), डॉ.शमीम शेख, माजी सहा.पशुसंवर्धन आयुक्त (सदस्य), श्री.मुनीर शेख, कृषी अधिकारी (सदस्य), श्री.अब्दुलरझाक मुल्ला, विस्तार अधिकारी (सदस्य), श्री. कय्यूम दाखवे, मुख्याध्यापक (सह खजिनदार), श्री.मुजीब शेख, तलाठी (सदस्य), श्री.मुदसर काझी, कृषी सहाय्यक (सदस्य), डॉ.मोहसीन शेख, प्रख्यात डेंटिस्ट हे उपस्थित होते.