MRAAKA द्वारा डॉ. नितिन करीर साहब को महाराष्ट्र राज्य के प्रधान सचिव के रूप में नियुक्ति पर बधाई

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन तर्फे,
मा. डॉ . नितिन करीर साहेब (आय. ए. एस.) यांची मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती झाल्यामुळे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन अभिनंदन केले व मा.महोदयांना यशस्वी वाटचालीबद्दल मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

बुके व असोसिएशनची मार्गदर्शक पुस्तिका व डायरी मा. महोदय यांना देण्यात आली तसेच असोसिएशनचे उद्देश विशद केले.

मा. मुख्य सचिव महोदय यांनी असोसिएशनच्या शुभेच्छा आनंदाने स्विकारल्या व सामाजिक बांधीलकी जपताना असोसिएशनला संपूर्णतया मदत व मार्गदर्शन करणार असल्याचे सांगून असोसिएशनचे पदाधिकारी यांनी त्यांच्या कोणत्याही कामासाठी कोणतीही औपचारिकता न पाळता थेट भेटावे असे सांगितले तसेच असोसिएशनच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता व मानवी मूल्यांचे संवर्धन हे उद्देश जोपासून अतिशय चांगले काम करत आहात असे कौतुक करून नैतिक पाठबळ दिले .

याप्रसंगी मा.डॉ.डेव्हिड अल्वारीस साहेब, तांत्रिक न्यायाधीश, विक्रीकर नायाधिकरण (ज्येष्ठ उपाध्यक्ष) व श्री हाजी जतकर , राज्यकर उपायुक्त , वरीष्ठ श्रेणी (अध्यक्ष ), श्री. मोहसीन बागवान, कक्ष अधिकारी, मंत्रालय (सदस्य), श्री.इम्रान नाईकवाडी, सहायक राज्यकर आयुक्त (सदस्य), श्रीमती तमन्ना नाईकवाडी, कक्ष अधिकारी, मंत्रालय (सदस्या) हे उपस्थित होते.

Related News