मा. मनोज सौनिक साहेब (आय. ए. एस.) यांची मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती झाल्यामुळे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन अभिनंदन

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशनतर्फे, मा. मनोज सौनिक साहेब (आय. ए. एस.) यांची मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती झाल्यामुळे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन अभिनंदन केले व मा.महोदयांना यशस्वी वाटचालीबद्दल मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

बुके व असोसिएशनची मार्गदर्शक पुस्तिका व डायरी मा. महोदय यांना देण्यात आली तसेच असोसिएशनचे उद्देश विशद केले.

मा. मुख्य सचिव महोदय यांनी असोसिएशनच्या शुभेच्छा आनंदाने स्विकारल्या व सामाजिक बांधीलकी जपताना असोसिएशनला संपूर्णतया मदत व मार्गदर्शन करणार असल्याचे सांगून असोसिएशनचे पदाधिकारी यांनी त्यांच्या कोणत्याही कामासाठी कोणतीही औपचारिकता न पाळता थेट भेटावे असे सांगितले तसेच असोसिएशनच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता व मानवी मूल्यांचे संवर्धन हे उद्देश जोपासून अतिशय चांगले काम करत आहात असे कौतुक करून नैतिक पाठबळ दिले .

याप्रसंगी मा.श्रीमती ऐनुल अत्तार, माजी सह सचिव, मंत्रालय (मार्गदर्शिका), श्री हाजी जतकर , राज्यकर उपायुक्त , वरीष्ठ श्रेणी (अध्यक्ष ), श्री. लालमिया शेख, कार्यकारी संचालक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ (सह खजिनदार ), श्री. आरीफ मुलाणी, राज्यकर उपायुक्त (सदस्य), श्री.गुलामनाबी शेख, शिधावाटप अधिकारी (चिटणीस), श्री.दस्तगीर मुल्ला, राजपत्रित स्टेनो, सेशन कोर्ट (खजिनदार ) हे उपस्थित होते.