छत्रपती संभाजी नगर विभागीय बैठक

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA)
(शासन मान्यता प्राप्त)
राज्य समिती तर्फे

छत्रपती संभाजीनगर विभागीय दौरा व महत्त्वपूर्ण बैठक
शनिवार दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी उन्नती हॉटेल, क्रांती चौक, संभाजीनगर येथे घेणेत आली.

ही बैठक अतिशय सकारात्मक व अतिशय उत्साहात पार पाडली.

या बैठकीमध्ये संभाजी नगर विभागीय जिल्ह्यातून व लगतच्या जिल्ह्यातून असे एकूण १२ जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा करणेत आली. त्यामध्ये मुख्यत्वे

१) अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे व त्यांचे सक्षमीकरण करणे.

२) अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी व समाज यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मल्टी स्टेट पतसंस्था स्थापन करणे.

३) अल्पसंख्याक समाजातील प्रशासनात टक्का वाढण्यासाठी स्पर्धा परीक्षा अकॅडमी स्थापन करणे.

४) दलित अल्पसंख्याक समाजाचे सक्षमीकरण होण्यासाठी कॅडर विकसित करणे.

 

या दौऱ्यात मार्गदर्शन करण्यासाठी खालील मान्यवर उपस्थित होते.

१. मा. डॉ. सादिक पटेल, गुणश्री प्राध्यापक (मुख्य आश्रय दाता).

२. मा. श्री. एजाज नकवी, माजी संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य (मुख्य मार्गदर्शक).

३. मा. डॉ. डेव्हिड अल्वारीस,
सदस्य, केंद्रीय जी. एस. टी. अपीलेट ट्रिबूनल (ज्येष्ठ उपाध्यक्ष व मार्गदर्शक).

४. मा. श्री. नासिर कादरी – माजी संचालक, महापारेषण व संचालक, महा मेट्रो (मुख्य मार्गदर्शक).

५. मा. श्री. फैयाज खान, मुख्य कार्यकारी अधिकारी, वक्फ बोर्ड, महाराष्ट्र राज्य (मुख्य मार्गदर्शक).

६. मा. हाजी सैपन जतकर, माजी राज्यकर सह आयुक्त व सदस्य, मुस्लिम ओ. बी. सी. प्रवर्ग आढावा समिती (संस्थापक अध्यक्ष).

७. मा. श्री. सलीम शेख, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (ज्येष्ठ उपाध्यक्ष).

८. मा. श्री. मोहम्मद युसुफ निशानदार, माजी कार्यकारी अभियंता, सिडको (उपाध्यक्ष).

९. मा. श्री. प्रफुल्ल बनसोडे, माजी कृषी उपसंचालक (मार्गदर्शक).

१०. मा. श्री. नजीर शेख, माजी राज्यकर उपायुक्त (चिटणीस).

११. मा. शरीफ पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

१२. मा. श्रीमती साजिदबानू शहापूरे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा, विभाग (सदस्या).

१३. मा. शबाना कादरी, कार्यकारी अभियंता, जलसंपदा.

१४. मा. डॉ. पीरसाब अत्तार, सहायक प्राध्यापक, व्हि.जे. टी.आय. (चिटणीस).

१५. मा. सरोश भुरे, माजी मुख्याध्यापक (सह खजिनदार).

१६. मा. कयूम दाखवे, मुख्याध्यापक (सह खजिनदार).

१७. मा. फारुख खाटिक, पदवीधर शिक्षक (सदस्य).

१८. मा. मजीद शेख, माजी मुख्याध्यापक (सदस्य).

१९. मा. फहीम मोमीन, पदवीधर शिक्षक (सदस्य).

संभाजी नगर जिल्ह्यातील खालील पदाधिकारी यांनी ही बैठक यशस्वी करणेसाठी खूप परिश्रम घेतले.

१. श्री. मसिउद्दीन सय्यद, माजी कार्यकारी अभियंता.

२. श्री. रशिओद्दीन शेख, माजी विशेष लेखा परीक्षक वर्ग -१ व सल्लागार, मार्टी.

३. श्री. जलील शेख, उपायुक्त, बहुजन कल्याण विभाग.

४. श्री. शहीद सय्यद, माजी परिवहन अधिकारी.

५. श्री. अझरुद्दीन काझी, अप्पर अधीक्षक, जलसंपदा.

६. मा. झकी अहमद, सर्वेक्षण अधिकारी.

७. मा. शमीम सय्यद, प्राध्यापक.

या बैठकीसाठी संभाजी नगर, नांदेड, परभणी, बीड, लातूर, जालना, हिंगोली, जळगाव, नाशिक, बुलढाणा, पुणे, अहिल्या नगर, धाराशिव या जिल्ह्यातून ११० अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.