शाखा बुलढाणा : मान्यवरांना संस्थेची डायरी व दिवाळी शुभेच्छा पत्र देण्यात आले

बुलढाणा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशन टीम आज जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेब श्री. मा. किरण पाटील साहेब तसेच CEO साहेब श्री. गुलाबराव खरात साहेब यांना भेटायला गेले असता CEO साहेबांनी चर्चा दरम्यान असे सांगितले की, “मी यापूर्वी उल्हानगर येथे होतो माझ्या जागेवर संघटनेचे पदाधिकारी अजीज शेख हे उल्हानगर येथे रुजू झाले तसेच त्यांनी असेही सांगितले की, संघटनेचे अध्यक्ष हाजी सैपन जतकर साहेब हे माझे जवळचे मित्र आहेत.” संघटनेला सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली याप्रसंगी, बुलढाणा जिल्हाअध्यक्ष शेख चाँद सर कार्याध्यक्ष रियाज शेख उपाध्यक्ष आगामिया शाह सहसचिव रफिक सय्यद खजिनदार फुरकान सय्यद संघटक शेख बिस्मिल्लाह तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. दिवाळीच्या शुभअवसरी भेट म्हणून मान्यवरांना संघटनेची डायरी तथा दिवाळीचे शुभेच्छा पत्र देण्यात आले.