महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन तर्फे मा.याकूब शिखा साहेब (आय.आर. ए.एस.), सी. ई.ओ.हज कमिटी ऑफ इंडिया यांनी २०२२ या वर्षाकरीता हज यात्रा अत्यंत यशस्वीपणे नियोजन करून पूर्ण केल्याबद्दल व प्रथमच हज यात्रा केल्याबद्दल शॉल व बुके देऊन मनःपुर्वक सत्कार करणेत आला.
याशिवाय श्री.जावेद कलंगडी साहेब, डेप्युटी सी. ई. ओ.हज कमिटी ऑफ इंडिया यांनी हज यात्रा यशस्वी करण्याबरोबरच प्रथमच हज यात्रा केल्याबद्दल त्यांचा सुध्दा शॉल व बुके देऊन मनःपुर्वक सत्कार करणेत आला.
दोन्ही मान्यवरांनी सत्कार अतिशय आनंदाने स्विकारला व पुढील हज यात्रा सुध्दा चांगल्या रीतीने व्हावी अशी दुवा करूया असे सांगितले.
याप्रसंगी श्री.हाजी जतकर साहेब, राज्यकर उपायुक्त,वरीष्ठ श्रेणी (अध्यक्ष), श्री. अजीज शेख साहेब, आयुक्त, महानगरपालिका (उपाध्यक्ष), श्री.नजीर शेख साहेब, राज्यकर उपायुक्त (चिटणीस), श्री.दस्तगीर मुल्ला साहेब, राजपत्रित स्टेनो (खजिनदार) हे उपस्थित होते.