महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशन आयोजित सत्कार समारंभ व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरामध्ये मा.डॉ. मकसूद अहमद खान यांचे प्रतिपादन*
मुंबई दि. २० जानेवारी २०१९.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशनच्या वतीने सत्कार समारंभ व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर रविवार दि. २०/०१/२०१९ रोजी हज हाउस, मुंबई येथे पार पडला.. या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय हज समितीचे सी. ई. ओ. मा. डॉ. मकसूद अहमद खान साहेब तर विशेष अतिथी म्हणून माजी अप्पर विक्रीकर आयुक्त मा. हसन नवाब साहेब हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी लेखा व कोषागारे संचालक मा. एजाज नकवी साहेब हे होते.
या कार्यक्रमात मा. डॉ. सादीक पटेल साहेब यांचा शासनाने *गुणश्री प्राध्यापक* ही नियुक्ती देऊन गौरव केला त्याबद्दल व मा. श्री. खलील अन्सारी साहेब यांना *कार्यकारी संचालक*, जलसंपदा या पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल सपत्नीक सत्कार कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा. मकसूद खान साहेब व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. एजाज नकवी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून माजी सहसचिव व विद्यमान प्रबंधक, जलप्राधिकरण मा. श्रीमती. नसीमा शेख मॅडम, व राज्यकर सहआयुक्त मा. डॉ. डेव्हीड अल्वारीस साहेब हे उपस्थित होते.
सुरुवातीस कार्यक्रमाची भूमिका विषद करताना असोसिएशनचे अध्यक्ष श्री. हाजी जतकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या आदर्श विचारसंहितेस अनुसरून असोशिएशनची शासनाच्या पाठबळाने स्थापना झाल्याचे सांगितले. अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम असोसिएशनच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या सक्षमीकरणासाठी ४ जुलै २०१६ व अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २६ एप्रिल २०१८ रोजी परिपत्रके काढून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सिद्ध केले. याबद्दल मा. मुख्यमंत्री महोदयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याशिवाय असोसिएशनच्या या कार्यास मा. रत्नाकर गायकवाड साहेब, माजी मुख्य सचिव व माजी मुख्य माहिती आयुक्त , मा.सुमित मल्लिक साहेब, माजी मुख्य सचिव व विद्यमान मुख्य माहीती आयुक्त तसेच विद्यमान मुख्य सचिव मा.दिनेश कुमार जैन साहेब यांचेकडून प्रेरणा व आधारस्तंभ पाठिंबा मिळत आहे. त्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मुख्य अतिथी या नात्याने बोलताना मा. डॉ. मकसूद खान साहेब यांनी संघटना बळकट करायची असेल तर प्रत्येक सभासदाने योगदान दिले पाहीजे व अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी यांचे प्रश्न पूर्ण अभ्यास करून सोडवण्यावर भर दिला पाहिजे असे मत व्यक्त केले.
विशेष अतिथी मा. हसन नवाब साहेब यांनी संघटना स्थापन करताना सकारात्मक पाठिंबा दिल्याचे सांगून ही संघटना अल्पावधीत एवढ्या उंचीवर नेल्याबद्दल असोसिएशनच्या सर्व सभासदांचे कौतुक केले व यापुढेही सर्व सभासदांना कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
सत्कारमूर्ती या नात्याने बोलताना मा. डॉ. सादीक पटेल साहेब यांनी संघटना वाढीसाठी जे जे साभासद काम करतात त्यांना प्रोत्साहीत केले व यापुढे संघटनेसाठी अधिक वेळ देण्याचे आश्वासन देतानाच सत्कार केल्याबद्दल संघटनेचे आभार व्यक्त केले.
दुसरे सत्कारमूर्ती मा. खलील अन्सारी साहेब यांनी सत्काराला उत्तर देताना संघटनेच्या वाटचालीबद्दल प्रशंसा केली व संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रत्येक सभासदाला ओळख मिळत आहे. मी पण त्याचा भाग आहे असे आवर्जून सांगितले. याशिवाय या सत्काराबद्दल आदरभाव व्यक्त केला.
सन्माननीय अतिथी या नात्याने मा. नसीमा शेख मॅडम यांनी महाराष्ट्रात अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी यांचेकडे प्रश्न नेताना त्याची व्यवस्थित मांडणी करून नम्रतेने जाण्याचे आवाहन केले.
मा. डॉ. डेव्हीड अल्वारीस साहेब यांनी संघटना वाढीसाठी अजून परिश्रम घेण्याची गरज व्यक्त केली. तसेच सर्वांना एका व्यासपीठावर आणणारे माध्यम म्हणजे संघटना असल्याचा पुनरुच्चार केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. एजाज नकवी साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित असलेल्या सर्व सभासदांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की, संघटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे संघटना वाढीसाठी प्रत्येकाने क्रियाशील राहिले पाहिजे असे सुतोवाच केले.
या कार्यक्रमामध्ये निवृत्त झालेल्या, पदोन्नती झालेल्या व नियुक्ती झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्री. आयूब पठाण साहेब, तत्कालीन शहर अभियंता पिंपरी चिंचवड मनपा, श्री. अजिज कारचे साहेब, तत्कालीन आयुक्त महानगरपालिका, श्रीमती. शाहिना पठाण, माजी प्राचार्या, श्री. मसीउद्दिन सय्यद, माजी उप अभियंता, यांचा निवृत्ती प्रित्यर्थ सत्कार करण्यात आला.
पदोन्नती झालेल्या अधिकारी सौ. साजेदा शहापुरे , (कार्यकारी अभियंता)श्री. शमीम शेख, (सहा. पशुसंवर्धन आयुक्त )श्री. हमीद शेख (स्टोर कीपर),श्री तोहीद महात (वरीष्ठ सहा. अधिकारी) यांचा सत्कार करणेत आला. याशिवाय मा.रफिक कुरेशी , अध्यक्ष, ऑल इंडिया बी. पी .टी ऑफीसर एम्प्लॉयी अससोसिएशन,श्री. झाकीर मुलाणी, चेअरमन सांगली सॅलरी सोसायटी, श्री. बशीर शेख, चेअरमन,अल्पसंख्याक पतसंस्था यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये श्रीमती शाहीना पठाण , माजी प्राचार्या, बुलडाणा, डॉ. अल्लाउद्दीन शेख , वैद्यकीय अधिकारी वर्ग १,नंदुरबार, डॉ. युनूसखान पठाण , उप शिक्षण अधिकारी, नंदुरबार, श्री.सरोश भुरे , मुख्याध्यापक, भिवंडी, श्री. जफर मुजावर, मुख्याध्यापक, भिवंडी, श्री. हाजी असिफ बिलाल अन्सारी,मुख्याध्यापक, नंदूरबार हे *आजीव सभासद* झाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
मा. सिराज शेख साहेब, मुख्य अभियंता, बी. पी. टी., श्री. सैफुलाह खान साहेब, उद्योजक, श्री. अमजद पठाण साहेब, मा. मोहम्मद हुसेन मुजावर साहेब, हे आवर्जून उपस्थित होते.
याप्रसंगी अससोसिएशन ची दिनदर्शिका १०१९ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करणेत आले.
श्री. एहसान सय्यद यांचे अल्पसंख्याक युवकांसाठी मार्गदर्शन व भविष्यकाळात साकार करण्याचे स्वप्न यावर अतिशय उत्कृष्ट विवेचन केले त्याबद्दल उपस्थित मान्यवर व अधिकारी कर्मचारी यांनी कौतुक केले.याप्रसंगी त्यांचाही सत्कार करणेत आला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. अजीज शेख (उपयुक्त, महानगरपालिका), श्री. ताजदारखान पठाण (राज्यकर उपयुक्त), श्री. सलीम शेख (कार्यकारी अभियंता, सा. बां. वि.), श्री. मो. युसुफ निशानदार (कार्यकारी अभियंता, सिडको), श्री. नजीर शेख (राज्यकार उपयुक्त), श्री. सलीम बागवान (राज्यकार आयुक्त), श्री. अशफाक शेख (सहा. संचालक, नगररचना), श्री. यासीन मापारा (सहा. कार्यकारी अभियंता, सिडको), श्री. सुहेल खान (सहा. कार्यकारी अभियंता, सिडको), श्री. तन्वीर सय्यद (सहा. राज्यकर आयुक्त), श्री. गुलामनबी शेख (शिधावाटप अधिकारी), श्री. दस्तगीर मुल्ला (राजपत्रित स्टेनो), श्री. मो. हानिफ पिरजादे (राज्यकर अधिकारी), श्री. इम्रान मुजावर (विक्रीकर अधिकारी), श्री. सलीम मुलाणी, (सहा. लेखा अधिकारी) श्री. एन. जी. शेख (सर्व्हेअर, सिडको), श्री. सादीक शेख (विकास अधिकारी), श्री. रियाज शेख (तलाठी), श्री.सरोश भुरे,(मुख्याध्यापक ) श्री. कय्युम दाखवे (मुख्याध्यापक), श्री. आगामिया शाह (मुख्याध्यापक), श्री. मेहमूद शेख (पदवीधर शिक्षक), श्री. फारूक शेख (पदवीधर शिक्षक), श्री. गुलजार दळवी (पदवीधर शिक्षक), श्री. अखलाख शेख (पदवीधर शिक्षक), श्री. इरफान बेलासे (पदवीधर शिक्षक), श्री. हैदर शेख (वरिष्ठ लिपिक), श्री. आसिफ सय्यद (कर सहाय्यक) श्री. सरोवर शेख (कर सहाय्यक), श्री. हसन खान (लिपिक), श्री. गौसमोहम्मद इनामदार, श्री. महम्मद हनिफ जातकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सादीक शेख व श्री. फारुख शेख यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले.
असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. सलीम शेख यांनी आभार व्यक्त केले. यामध्ये मा.डॉ. मकसूद खान साहेब यांनी हज हाऊस येथे हाल व राहण्यासाठी अतीशय उत्तम सोय केल्यानेच हा कार्यक्रम यशस्वी झाला याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणेत आली.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
या कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी व अधिकारी कर्मचारी यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमास सर्वदूर महाराष्ट्रातील १५० अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या सत्कार कार्यक्रमानंतर दुसऱ्या सत्रात कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबीर पार पडले. यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले १५० अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून प्रत्येक जिल्ह्यात संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.