स्टडी रूम व लायब्ररी उभारणी अभियान

मराक्का च्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने तुपडी, ता. निलंगा , जि लातुर येथे उभारणी करण्यात आलेल्या स्टडी रूम व लायब्ररीचे उद्घाटन संपन्न

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आज मराक्का च्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने तसेच तुपडी येथील श्री कुद्दूस शेख या होतकरू तरुणांच्या अथक प्रयत्नांनी अल्पसंख्यांक समाजाची 150 कुटुंबे असलेल्या तुपडी,ता. निलंगा,जि लातुर येथे उभारणी करण्यात आलेल्या स्टडी रूम व लायब्ररीचे उद्घाटन मराक्का सदस्य मा. रियाज शेख सर (केंद्रीय विद्यालय लातूर) व मा.तुषार कांबळे सर यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.

 

या स्टडी रूम व लायब्ररीसाठी आवश्यक स्टडी टेबल, खुर्च्या, रॅक,स्टडी मटेरियल, व्हाईट बोर्ड तसेच खेळाचे साहित्य हे शिक्षणास नेहमीच प्रोत्साहन देणारे मराक्का पुणे चे उपाध्यक्ष मा. शाहेद काझी सर (कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे) यांच्याकडून देण्यात आलेले आहे.
मराक्का पुणे चे सचिव मा.अब्दुलरज्जाक मुल्ला सर यांनी याप्रसंगी उपस्थितांना तसेच विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉल द्वारे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
मा.रियाज शेख सर, मा.तुषार कांबळे सर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले तसेच शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी देखील या स्टडी रूम व लायब्ररीचा योग्य वापर करून उज्वल यश संपादन करण्याची ग्वाही दिली. पालकांच्याकडून देखील या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले तसेच ग्रामीण भागात हा उपक्रम सुरू केल्याबद्दल मराक्का पदाधिकारी यांचे आभार मानले तसेच माननीय शाहेद काजी सर यांचे देखील आभार मानले व दुआ दिल्या.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने तुपडी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वांना नम्र विनंती आहे की, शिक्षणास प्रोत्साहन देणारा उपक्रम आपल्या भागात देखील सुरू करावा जेणेकरून समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्यास प्रोत्साहन मिळेल