राज्य कार्यकारिणी बैठक संभाजी नगर (औरंगाबाद ) येथे संपन्न

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशन( शासन मान्यता प्राप्त) राज्य कार्यकारिणी बैठक संभाजी नगर (औरंगाबाद ) येथे संपन्न.

दिनांक ११ मार्च २०२३ रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) सिंचन भवन येथे राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.

 

सर्वप्रथम मा. श्री अश्फाक शेख सहसंचालक निवृत्त नगररचना (सरचिटणीस) कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व संघटना कशी वाढवावी व त्याबद्दल काय कार्य करावे लागणार यावर सखोल मार्गदर्शन केले. यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नंतर श्री मसिदिन सय्यद उपकार्यकारी अभियंता निवृत्त (उपाध्यक्ष) यांची कार्यक्रमा अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली.

या कार्यक्रमात संघटना वाढीसाठी व आर्थिक घडी कशी बसेल यावर सखोल चर्चा करण्यात आली नंतर पदोन्नती झालेल्या सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला.

माननीय मोहम्मद रजा खान (उपाध्यक्ष) उपसंचालक नगर रचना यांनी संघटनेच्या औरंगाबाद कार्यालयासाठी जागा किंवा ऑफिस मी स्वतः देईन असे जाहीर केले त्यानंतर मे महिन्यामध्ये राज्याचा वार्षिक अधिवेशन छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे घेण्यात यावा असे सुचवले. यानंतर छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

माननीय श्री जलील शेख (अध्यक्ष )विभागीय आयुक्त सामाजिक न्याय. माननीय जाकीरुद्दीन (सचिव )असिस्टंट अकाउंट ऑफिसर. माननीय काझी अझरुद्दीन (कोषाध्यक्ष) असिस्टंट इंजिनियर. माननीय डॉक्टर सिराज बेग (सल्लागार) विभाग प्रमुख तथा अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांची प्राथमिक रूपाने कार्यकारिणी जाहीर करणे त आली व उर्वरित पदाधिकारी हे नंतर निवडण्यात येतील.

नंतर औरंगाबाद विभागातून आलेले विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांचे प्रश्न जाणून घेतले. व सदर प्रश्न कसे सोडवले जातील यावर चर्चा झाली.

या कार्यक्रमासाठी श्री. हाजी जतकर (अध्यक्ष) राज्यकर उपायुक्त वरिष्ठ श्रेणी, माननीय श्री अजीज शेख (उपाध्यक्ष )आयुक्त, मनपा उल्हासनगर. माननीय मोहम्मद रजा खान (उपाध्यक्ष) उपसंचालक नगररचना. माननीय श्री सय्यद मसिउदिन (उपाध्यक्ष) उप कार्यकारी अभियंता ( नि.) जलसंपदा . माननीय युसुफ निशाणदार (उपाध्यक्ष) कार्यकारी अभियंता ( नि.) सिडको. माननीय श्री अश्फाक शेख (सरचिटणीस) सहसंचालक (नि.) नगररचना मनपा पनवेल. माननीय श्री नजीर शेख (चिटणीस) राज्यकर उपायुक्त मुंबई. माननीय श्री दस्तगीर मुल्ला (खजिनदार) निवड श्रेणी स्टोनो. माननीय श्री कय्युम दाखवे. (सह खजिनदार) मुख्याध्यापक रायगड. व औरंगाबाद विभागातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष सचिव व सदस्य यासह ७५ अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.