गौरव, सत्कार व ईद मिलन कार्यक्रम – २१ मे २०२२

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन ही महाराष्ट्रातील अधिकारी कर्मचारी यांना मिळालेली देणगी असून या व्यासपीठावर स्वतःच्या व समाजाच्या सक्षमीकरणासाठी सामील व्हा… मा.डॉ.सादिक पटेल,

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन तर्फे कार्य गौरव, सत्कार व ईद मिलन कार्यक्रम दिनांक २१ मे २०२२ रोजी जे.जे.रुग्णालय हॉल, मुंबई येथे आयोजित करणेत आला होता. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मा.डॉ.सादिक पटेल साहेब, गुणश्री प्राध्यापक व माजी विभाग प्रमुख,जे.जे रुग्णालय हे होते.
या कार्यक्रमात गौरवमूर्ती म्हणून मा.डॉ.नागसेन रामराजे साहेब,माजी अधिष्ठाता,धुळे वैद्यकिय महाविद्यालय व माजी विभाग प्रमुख, जे.जे.रुग्णालय कुटुंबासह उपस्थित होते व दुसरे गौरवमूर्ती मा.डॉ. मकसूद खान साहेब, माजी सी. ई. ओ.हज कमिटी ऑफ इंडिया हे होते.

सन्माननीय अतिथी म्हणून मा.नसीमा शेख मॅडम ,माजी सह सचिव, मंत्रालय हे होत्या.

सत्कारमूर्ती म्हणून मा.शौकत अली शेख साहेब, अप्पर राज्यकर आयुक्त, मा.डॉ.डेव्हिड अल्वारीस साहेब, राज्यकर सह आयुक्त, मा. नसीर कादरी साहेब, संचालक, महापारेषण, मा.फैय्याज खान साहेब, महाव्यवस्थापक, गृहनिर्माण,सिडको , मा.डॉ.आकाश खोब्रागडे साहेब, अधीक्षक, सेंट जॉर्ज हॉस्पिटल व कोरोना काळातील उत्कृष्ठ कार्य केलेले व मा.राज्यपाल यांचे हस्ते गौरव केलेले अधिकारी हे होते.

या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी, गौरवमूर्ती व सत्कारमूर्ती यांचा असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक सत्कार करणेत आला.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सामाजिक विचारवंत मा.प्रा.जावेद पाशा साहेब व नामांकित कॉर्पोरेट कंपनीच्या उपाध्यक्षा तसेच सामाजिक विचारवंत कवियत्री मा.श्रीमती नेहा गोडघटे मॅडम यांची विशेष उपस्थिती होती व या कार्यक्रमामध्ये या दोन्ही मान्यवरांचा सत्कार करणेत आला .

या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त झालेले अधिकारी – कर्मचारी, पदोन्नती झालेले अधिकारी कर्मचारी, नेत्रदीपक यश मिळविलेल्या व्यक्ती, समाजामध्ये उत्कृष्ट काम केलेले व्यक्ती व प्रशासनात नव्याने रुजू झालेले अधिकारी यांचा सत्कार करणेत आला.

असोसिएशनच्या जडण घडण बद्दल बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष श्री.हाजी जतकर, राज्यकर उपायुक्त,वरीष्ठ श्रेणी यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारावर असोसिएशनची स्थापना झाल्याचे सांगून राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवणे व मानवी मूल्यांचे संवर्धन करणे हा असोसिएशनचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून आजपर्यंतचा आढावा घेतला व असोसिएशन मध्ये जास्तीत जास्त आधिकरी कर्मचारी सामील होऊन स्वतःचे व समाजाचे सक्षमीकरण कसे होईल हा ध्यास उराशी बाळगून राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हा व अन्यायाविरुध्द लढून डॉ.बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावेत असे आवाहन केले.

गौरवमूर्ती या नात्याने बोलताना मा. डॉ.नागसेन रामराजे साहेब यांनी संघटनेचे महत्त्व विषद करताना सांगितले की, संघटनेमध्ये राहून अनेक लोकोपयोगी कामे केली व करता येतात त्यामुळे संघटनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे सांगितले.

मा.डॉ. मकसूद खान साहेब यांनी अतिशय उत्कट विचार मांडताना सांगितले की, असोसिएशनला मार्गदर्शन करण्याचा व लोकांसाठी काम करण्याचा योग आल्याचे सांगून अनेक अधिकारी कर्मचारी या व्यासपीठावर आपुलकीने येतात त्याबद्दल आनंद व्यक्त केला याशिवाय हज कमिटी ओफ इंडियाचे सी.ई ओ.असताना अल्पसंख्याक समाजातील हुशार व होतकरू उमेदवारासाठी हज हाऊस येथे असोसिएशनच्या विद्यमाने एम. पी.एस सी चे निवासी प्रशिक्षण वर्ग चालू करून दिलासा देऊन आनंद मिळाल्याचे सांगताना असोसिएशनसाठी अधिकारी कर्मचारी यांनी भविष्यकाळात योगदान देण्याचे आवाहन केले.

प्रमुख अतिथी या नात्याने बोलताना मा.डॉ.सादिक पटेल साहेब यांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन ही महाराष्ट्रातील अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी यांना मिळालेली देणगी आहे त्यामुळे बहुसंख्य अधिकारी कर्मचारी या असोसिएशनमध्ये सामील झाल्यास समाजाचे सक्षमीकरण निश्चित होईल असा आशावाद व्यक्त केला.

सत्कारमूर्ती व कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने बोलताना मा.शौकत अली शेख साहेब यांनी संघटनेमध्ये काम केल्यास संरक्षण व आत्मविश्वास मिळतो त्यामुळे असोसिएशनचे महत्व अबाधित राहते असे सांगितले.

या कार्यक्रमामध्ये श्री. लालमिया शेख साहेब यांची मौलाना आझाद महामंडळावर कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त झालेले श्री. इजाजुल्ला खान,शिक्षणाधिकारी, अमरावती, श्री.नासीर बिराजदार, कार्यकारी अभियंता,जलसंपदा, पुणे, श्री.मजीद शेख, प्राध्यापक,रायगड, श्री अक्रमुद्दिन मुलाणी,कक्ष अधिकारी, मंत्रालय, मुंबई, श्री.अजमात पाशा गढवाल,कक्ष अधिकारी, पुणे, श्री.अजीम मुल्ला,मुख्याध्यापक, रायगड यांचा सत्कार करणेत आला.

पदोन्नती मिळालेल्या अधिकारी कर्मचारी यामध्ये श्री. सैफुन शेख, उप वनसंरक्षक, पनवेल, श्री.मोहसीन बागवान , कक्ष अधिकारी, मंत्रालय, मुंबई, श्री.अनिस पिंजारी, वरीष्ठ सहायक, नंदुरबार ,श्री. असिफ सय्यद, कर निरीक्षक, श्रीमती अफ्रीन कुरेशी, कर निरीक्षक यांचा सत्कार करणेत आला.

असोसिएशनचे ज्येष्ठ उपाध्यक्ष व मार्गदर्शक मा.डॉ.डेव्हिड अल्वारीस साहेब यांची कन्या कुमारी ॲलिस अल्वारीस हिने सी.एस.(कंपनी सेक्रेटरी) ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करणेत आला.

देशाप्रती व समाजाप्रती उत्कृष्टरित्या काम केलेल्यामध्ये श्री. जानमोहमद पठाण,माजी पोलिस आयुक्त, पुणे (छ.शिवाजी महाराजांचा पुतळा तैवांग, हिमाचल प्रदेश येथे स्थानापन्न केला ), प्रा.डॉ.शाफियोदीन सय्यद, संशोधक, बीड ( चांद्रयान मोहीम यशस्वी होणेसाठी प्रयत्न) प्रा.डॉ.मुस्तफा सय्यद,औरंगाबाद (पेटंट संशोधन), श्री.इम्तियाज शेख,पुणे (सामाजिक कार्य), यांचा सत्कार करणेत आला.

नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये श्रीमती वसीमा शेख (उप जिल्हाधिकारी), श्रीमती आसमा सय्यद (सहायक राज्यकर आयुक्त), श्रीमती समीना बागवान (उप अधीक्षक, भूमी अभिलेख), श्री.फैय्याज शेख (उप अधीक्षक, भूमी अभिलेख), श्री.वसीम शेख (पोलिस उप निरीक्षक ) यांचा सत्कार करणेत आला.

हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी श्री.मोहम्मद युसुफ निशाणदार, माजी कार्यकारी अभियंता, सिडको (उपाध्यक्ष), श्री.लालमिया शेख, कार्यकारी संचालक,मौलाना आझाद महामंडळ (सह खजिनदार), श्री.नजीर शेख, राज्यकर उपायुक्त (चिटणीस), श्री.यासीन मापारा, कार्यकारी अभियंता,सिडको (चिटणीस), श्री. सूहेल खान, माजी कार्यकारी अभियंता, सिडको (सह खजिनदार), श्री.दस्तगीर मुल्ला, राजपत्रित स्टेनो (खजिनदार), श्री.असिर शेख, सहायक राज्यकर आयुक्त (चिटणीस), श्रीमती यास्मिन शेख, कामगार अधिकारी (सदस्या) , श्री.नासीर शेख, निरीक्षक बी.एम.सी (सदस्य), श्री.मोहम्मद आरीफ,राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री.लियाकत शेख,राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री.असिफ सय्यद, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री. सरोश भुरे, मुख्याध्यापक (सदस्य), श्री. काय्युम दाखवे, मुख्याध्यापक (सह खजिनदार), श्री.मोहंमद आरीफ, कर निरीक्षक (सदस्य), श्री.फारुख खाटीक, पदवीधर शिक्षक (सदस्य),;श्री.अखलाख शेख, पदवीधर शिक्षक (सदस्य), श्री.अंजुम पोवाला, पदवीधर शिक्षक, श्री.हसन खान, लिपिक, बी. एम.सी.,श्री. मोहमद जतकर, कर सहायक यांनी प्रयत्न केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नासीर खान,निरीक्षक बी एम सी. व श्री.फारुक खाटीक, पदवीधर शिक्षक यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले.

आभार प्रदर्शन श्री.नजीर शेख,राज्यकर उपायुक्त यांनी केले.

या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विभागातील मान्यवरांसह वेगवेगळ्या विभागातील १७५ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.