निवृत्ती प्रित्यर्थ शाल व बुके देऊन सत्कार : श्री.मेहबूब कासार साहेब

महाराष्ट्र राज्य अलपसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) तर्फे श्री.मेहबूब कासार साहेब, राज्यकर उपायुक्त (जी.एस. टी.) व असोसिएशनचे चिटणीस यांच्या निवृत्ती प्रित्यर्थ शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला व निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

सर्वप्रथम श्री.मेहबूब कासार साहेब यांचे यशस्वी सेवानिवृत्ती बद्दल अभिनंदन करण्यात आले व निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदाचे, आरोग्याचे, सुख समाधानाचे व भरभराटीचे जावो अशी अल्लाह चरणी प्रार्थना करणेत आली.

या सत्कार प्रसंगी मा.ताजदारखन पठाण साहेब, राज्यकर उपायुक्त (सदस्य), श्री.हाजी जतकर, राज्यकर उपायुक्त, वरिष्ठ श्रेणी (अध्यक्ष), श्री.असिर शेख, सहायक राज्यकर आयुक्त (चिटणीस), श्रीमती असमा सय्यद, सहायक राज्यकर आयुक्त (सदस्य), श्री.इम्रान मुजावर, राज्यकर अधिकारी (सह खजिन दार), श्री. वाहिद झारी, राज्यकर अधिकारी (सदस्य), डॉ.लियाकत शेख, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री. मोहम्मद आरीफ, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्रीमती.रिझवाना शाह, राज्यकर निरीक्षक (सदस्या ), श्री. जुबेर सय्यद, राज्य कर निरीक्षक (सदय), श्री.जावेद पठाण, राज्यकर निरीक्षक (सदय), श्री.करीम पठाण, कर सहायक (सदय) हे उपस्थित होते.