महाराष्ट्रातील अधिकारी -कर्मचारी यांनी समाजाच्या सक्षमीकरणासाठी संघटनेच्या व्यासपीठावर एकत्र यावेत….. !
मा.डॉ.सादिक पटेल,
——————————
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) तर्फे ईद मिलन/कार्य गौरव/ सत्कार कार्यक्रम २०२४ इस्लाम जिमखाना , मुंबई येथे शुक्रवार दिनांक २६/०४/२०२४ रोजी आयोजित करणेत आला होता.
असोसिएशनचे मुख्य आश्रयदाता व गुणश्री प्राध्यापक मा.डॉ.सादिक पटेल साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते व मा.महोदय यांनी असोसिएशनची यशस्वी वाटचाल संपूर्ण महाराष्ट्रात चालू असून अनेक उपक्रम घेवून सर्व समाजाला बरोबर घेऊन आम्ही जात आहोत असे सांगितले व महाराष्ट्रातील अधिकारी – कर्मचारी यांनी समाजाच्या सक्षमीकरणासाठी संघटनेच्या व्यासपीठावर एकत्र यावेत असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून मा.एजाज नकवी, माजी संचालक, लेखा व कोषागारे, मा.डॉ.मकसूद खान, माजी सी.ई. ओ.केंद्रीय हज कमिटी, मा.श्रीमती नसीमा शेख, माजी सह सचिव, मंत्रालय, मा. न्या.मेहबूब खान पठाण, माजी जिल्हा न्यायाधीश व सदस्य, विक्रीकर न्यायाधिकरण हे होते.
गौरवमूर्ती या नात्याने मा.डॉ.डेव्हिड अल्वारीस, माजी राज्यकर सह आयुक्त व सदस्य, विक्रीकर नयाधिकरण हे उपस्थित होते.
सन्माननिय अतिथी म्हणून मा.अजीज शेख, आयुक्त, महानगरपालिका, मा.फैयाज खान, महाव्यवस्थापक, सिडको, मा.नासीर मणेर (आय.आर.एस.), उपायुक्त, केंद्रीय जी.एस. टी, मा.सलमान शेख (आय.आर.एस.), उपायुक्त, केंद्रीय कस्टम विभाग, मा.शबाना शेख, सहायक पोलिस आयुक्त, मा .गफार मगदूम, कार्यकारी संचालक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, मा.अरबाज खान, सिने अभिनेते हे उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित असलेल्या सर्व अतिथी यांना असोसिएशनचे सन्मानचिन्ह व बुके देऊन स्वागत व सत्कार करणेत आला.
संघटनेप्रति उत्कृष्ठ कार्य केलेले व सेवानिवृत्त झालेले अधिकारी श्री.मोहम्मद युसुफ निशाणदार , माजी कार्यकारी अभियंता, सिडको, श्री.सुहेल खान, माजी कार्यकारी अभियंता, सिडको, श्री.नजीर शेख, माजी राज्यकर उपायुक्त, ऍडव्होकेट सलीम पटेल, नामवंत वकील, श्री.कैसर अहमद, माजी सहायक पोलिस आयुक्त, श्री.अब्दुल रौफ वहाब, माजी सहायक विक्रीकर आयुक्त, श्री. जान मोहम्मद पठाण, माजी सहायक पोलिस आयुक्त, श्री.तालिब सय्यद, माजी सहायक पशुसंवर्धन आयुक्त, श्री.सईद तन्वीर, माजी कार्यकारी अभियंता, डॉ.शमीम शेख, माजी सहायक पशुसंवर्धन आयुक्त, श्री.हसन पटेल, कक्ष अधिकारी, उच्च न्यायालय, श्री.हनीफ शेख, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, श्री. काय्युम कुरेशी, माजी विक्रीकर अधिकारी, श्री.सलीम खान, माजी व्यवस्थापक, महाबीज, श्री.शकील देशपांडे, वित्त व लेखाधिकारी, श्री. नझिम मणियार, उप अभियंता, जि.प., डॉ.अमजद पठाण, कॅन्सर तज्ञ, यांचा असोसिएशनचे सन्मानचिन्ह, शॉल व बुके देऊन सत्कार करणेत आला.
सत्कार मूर्ती म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नियुक्त व निवड झालेले मा. अल्ताप शेख (आय.सी.एल.एस), क्षेत्रीय सहायक संचालक, कॉर्पोरेट अफेयर मंत्रालय, मा.मोहम्मद हुसेन सय्यद (आय.आर.एस.), सहायक आयकर आयुक्त, मा.सय्यद तालिब, केंद्रीय लोकसेवा आयोग ६६७ गुणवत्ता हे उपस्थित होते.याशिवाय श्री.साजिद नावेद, ज्यू.असिस्टंट,सर्वोच्च न्यायालय या सर्वांचा असोसिएशनचे सन्मानचिन्ह व बुके देऊन सत्कार करणेत आला.
या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेले अधिकारी कर्मचारी श्री.इम्रान नाईकवाडी, सहायक राज्यकर आयुक्त, श्री.मोहम्मद ताऊसिफ , सहायक संचालक, लेखा व कोषागारे, डॉ.मशूद उल हक्क, सहायक प्राध्यापक, श्री.मोहम्मद जुबेर, सहायक प्राध्यापक, श्रीमती तमन्ना नाईकवाडी, कक्ष अधिकारी, श्री. आबिद पठाण, सहायक अभियंता, श्री. कय्युम सरकवास, राज्यकर निरीक्षक, श्री.एजाज सय्यद, राज्यकर निरीक्षक, श्री.मुजफ्फर पटेल, राज्यकर निरीक्षक, श्री.कलीम शेख , सहायक कक्ष अधिकारी, मंत्रालय , श्री.अमीर सूभानी, पोलिस उप निरीक्षक या सर्वांचा असोसिएशनचे सन्मानचिन्ह व बुके देऊन सत्कार करणेत आला.