स्थळ: खिलाफत हाऊस, मुंबई
दिनांक: शुक्रवार, १६ मे २०२४
१) महाराष्ट्रातील अधिकारी -कर्मचारी यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या सक्षमीकरणासाठी संघटनेच्या व्यासपीठावर एकत्र यावेत….. !
मा.डॉ.सादिक पटेल,
२) संघटनेच्या व्यासपीठावर अनेक विधायक कामे होतात... …
मा.एजाज नकवी.
३) मराकका मुळे संपूर्ण महाराष्ट्रात अधिकारी कर्मचारी यांना बळ मिळाले.. मा.अजिज शेख (आय. ए.एस.),
४) अपयश ही यशाची पहिली पायरी .. ..
मा.अदीबा अशफाक अहमद अनम . यू.पी.एस.सी.१४२ रँक.
५) सातत्य हेच यशाचे गमक… मा.सय्यद मोहम्मद आरिफ मोईन… यू.पी.एस.सी.५९४ रँक.
——————————
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) तर्फे ईद मिलन/कार्य गौरव/ सत्कार कार्यक्रम २०२५ खिलाफत हाऊस , मुंबई येथे शुक्रवार दिनांक १६/०५/२०२४ रोजी आयोजित करणेत आला होता.
सर्वप्रथम काश्मीरमध्ये अतीरेकी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करणेत आली.
त्यानंतर भारताचे
सरन्यायाधिशपदी नियुक्त झाल्याने मा.न्या.भूषण गवई साहेब यांचा अभिनंदनाचा ठराव पारीत करणेत आला.
त्यानंतर इतनी शक्ती दे दाता या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करणेत आली.
असोसिएशनचे मुख्य आश्रयदाता व गुणश्री प्राध्यापक मा.डॉ.सादिक पटेल साहेब हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते व मा.महोदय यांनी असोसिएशनची यशस्वी वाटचाल संपूर्ण महाराष्ट्रात चालू असून अनेक उपक्रम घेवून सर्व समाजाला बरोबर घेऊन आम्ही जात आहोत असे सांगितले व महाराष्ट्रातील अधिकारी – कर्मचारी यांनी समाजाच्या सक्षमीकरणासाठी संघटनेच्या व्यासपीठावर एकत्र यावेत असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.एजाज नकवी माजी संचालक, लेखा व कोषागारे, हे होते.
सन्माननिय अतिथी म्हणून मा.डॉ. अब्दुल वाहिद, माजी सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मा. सदरूद्दिन काझी, माजी जिल्हा न्यायाधीश व न्यायिक सदस्य, बी.पी. टी.,मा. न्या.अजमातुल्लाह कुरेशी, माजी जिल्हा न्यायाधीश व सदस्य, विक्रीकर न्यायाधिकरण, मा.अजिज शेख (आय. ए.एस.) कार्यकारी संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मा.एनुल अत्तार, माजी सहसचिव, मंत्रालय, मा.फैयाज खान, मुख्य महाव्यवस्थापक, सिडको, मा.फारुक दरवेश, नामवंत उद्योगपती, मा.डॉ.अब्रार सय्यद, विभाग प्रमुख, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मा.गफार मगदूम, कार्यकारी संचालक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, मा.इरफान भुरे, अध्यक्ष, एम.एस.पठाण एज्युकेशन ट्रस्ट, मा.शाहीद बिलग्रामी, कॅप्टन, एअर इंडिया हे होते.
या सर्व मान्यवरांना सन्मान चिन्ह, शाल व बुके देऊन स्वागत व सत्कार करणेत आला.
विशेष सत्कारमूर्ती या नात्याने मा. अदिबा अशफाक अहमद अनम,
यू पी.एस.सी.१४२ रँक.
व
मा.सय्यद मोहम्मद आरिफ मोईन,
यू. पी.एस.सी.५९४ रँक हे उपस्थित होते
या यशस्वी गुणवंतांचा सत्कार सन्मान चिन्ह, शाल व बुके देऊन करणेत आला.
सत्कारमूर्ती या नात्याने मा. मिनाज मुल्ला, अप्पर जिल्हाधिकारी,
मा.शबाना शेख, सहायक पोलिस आयुक्त, मा.नजीर शेख, माजी राज्यकर उपायुक्त, मा.यासीन मापारा , अधीक्षक अभियंता, सिडको, मा.अयुब तांबोळी, तहसीलदार हे उपस्थित होते
या सर्व सत्कारमूर्ती चां सत्कार सन्मान चिन्ह, शाल व बुके देऊन करणेत आला.
गौरवमूर्ती या नात्याने मा.झाकीर शेख, माजी वित्त व लेखा अधिकारी, मा.सय्यद मुनिरुद्दीन , माजी पोलिस उपनिरीक्षक, मा.सरोश भुरे, माजी मुख्याध्यापक, मा.अनिसआरा निशानदार हे उपस्थित होते .
या सर्व गौरवमूर्तींचा गौरव सन्मान चिन्ह, शाल व बुके दे ऊन करणेत आला.
संघटनेप्रती उत्कृष्ठ कार्य केलेले अधिकारी मा. मोहम्मद हुसेन मुजावर,माजी सचिव, महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोग, मा. फिरोज पटेल, माजी सहायक पोलिस आयुक्त, मा.सैदुद्दिन रसूल, माजी विक्रीकर उपयुक्त,
मा.डॉ. पिरसब अत्तार, सहयोगी प्राध्यापक, व्हीं.जे. टी.आय. मा.मुनीर बचोटीकर, कृषि विकास अधिकारी,वर्ग -१, मा.हारून इनामदार, उप अभियंता, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, मा.सादिक शेख, विकास अधिकारी, माविम, मा.अब्दुल रझाक मुल्ला, कृषि विस्तार अधिकारी, मा. युनूस शेख, कृषि विस्तार अधिकारी, मा. डॉ.समीर शेख, प्राचार्य ए.के.के.न्यू लॉ कॉलेज, मा. डॉ नूरइलाही, उप प्राचार्य, मा.अब्दुल सत्तार शेख,राजपत्रित स्टेनो ,मंत्रालय, मा.आरीफ मोहम्मद, राज्यकर निरीक्षक, मा.आसिफ सय्यद, राज्यकर निरीक्षक, मा .रिजवान शाह,राज्यकर निरीक्षक, मा.मुस्तफा मिर्झा,पोलिस उप निरीक्षक , मा. जव्वाद काझी यू .पी.एस.सी. प्रशिक्षक, मा.अखलाख शेख,पदवीधर शिक्षक, मा.फारुख खाटीक, पदवीधर शिक्षक, मा. हुसेन नदाफ सर आदर्श गुणवंत शिक्षक, गौसमुद्दिन शेख कोनेन फाऊंडेशन, शेख मोहम्मद कामील,आदील पब्लिकेशन या सर्वांचा सन्मान चिन्ह व बुके देऊन सत्कार करणेत आला.
यानंतर एम.पी.एस.सी.तर्फे नियुक्त झालेले दिवाणी न्यायदंडाधिकारी, वर्ग -१
मा.उजर अहमद,
श्रीमती तन्वी शेख,
श्रीमती शूमायला सदफ ,
यांचा सन्मान चिन्ह, व बुके देऊन सत्कार करणेत आला.
यानंतर डॉ.झारुसा फैयाज खान,
डॉ.सना हाजी जतकर ,
डॉ.मुस्कान दस्तगीर मुल्ला, यांनी वैद्यकीय पदवी मिळविल्याबद्दल सन्मानचिन्ह व बुके देऊन सत्कार करणेत आला.
यानंतर मा. इरफान मोहम्मद युसुफ निशानदार यांची फर्स्ट ऑफिसर,एअर इंडिया व मा. जाफर यासीन मापारा यांनी आय.आय.एम.मधून पदव्युत्तर पदवी मिळविल्याबद्दल सन्मान चिन्ह व बुके देऊन सत्कार करणेत आला.
यानंतर एम.पी.एस.सी.मधून नियुक्त झालेले
मा. अरबाज पठाण (राज्यकर निरीक्षक),
मा. असमा शेख (राज्यकर निरीक्षक), मा. नगमा शेख (कर सहायक) यांचा सन्मान चिन्ह व बुके देऊन सत्कार करणेत आला.
यानंतर समाजाप्रती उत्कृष्ठ कार्य करणारे
मा.विजय रणपिसे, माजी बँक व्यवस्थापक,
मा.नागसेन सोनारे, माजी महाव्यवस्थापक, ओ.एन.जी.सी.,
मा.उत्तमराव बोधवडे ,
माजी पोलिस उपायुक्त,
मा.डॉ.के.पी.शरीफ , उद्योगपती, मा.फारुख उजमाम , उद्योगपती, मा.रागीब शेख, उद्योगपती, मा.शिराज शेख , माजी अधीक्षक, बी.पी. टी., मा.जमीर काझी, नामवंत पत्रकार, मा.मोहम्मद शमीम खान, उद्योगपती, मा. आसिफ डेरीया, उद्योगपती, मा.निजामुद्दीन शेख, एल.आय.सी.अधिकारी, मा.अब्दुल नासीर अप्सरा, सामाजिक विचारवंत, डॉ. सॅम न्यूटन , कॉर्पोरेट ट्रेनर, मा. नौफील सय्यद , सामाजिक विचारवंत, मा. अली हकीम सय्यद , उद्योगपती, मा.मोहम्मद अफजल, उद्योगपती, मा.फिरोज मासूलदार, अध्यक्ष, उद्योगपती, मा.सिद्दिक बबला, उद्योगपती, मा.मौलाना रियाज कासमी, उद्योगपती, मा.इम्तियाज पिरजादा, उद्योगपती, मा.मुनवर पटेल, उद्योगपती, मा.फरहान अजिज, उद्योगपती, यांचा सन्मान चिन्ह, शाल व बुके देऊन सत्कार करणेत आला.
यानंतर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळमध्ये न्यायालयीन लढा देऊन कायमस्वरूपी शासनाच्या सेवेत नियुक्त झालेले
श्री.शकील शेख, जिल्हा व्यवस्थापक, श्रीमती फरजाना सत्तार, जिल्हा व्यवस्थापक,श्रीमती ज्योती हिवाळे, जिल्हा व्यवस्थापक, श्री.सलीम नदाफ, वसूली अधिकारी, श्री.हसन जमादार , वसूली अधिकारी, श्री.एकनाथ कांबळे, सहा.व्यवस्थापक, श्रीमती ज्योती भगत , सहा.व्यवस्थापक, श्री.सय्यद काद्री , सहा.व्यवस्थापक, श्री.नौफिस शेख , सहा.व्यवस्थापक, श्री.अरविंद कांबळे , सहा.व्यवस्थापक, श्री.रिजवान पठाण, सहा.व्यवस्थापक, श्री.सुनील भालेराव, सहा.व्यवस्थापक, श्री.मोहम्मद अन्सारी, सहा.व्यवस्थापक, श्री.उदय कांबळे, जिल्हा व्यवस्थापक, श्री.जहीर शेख , सहा. व्यवस्थापक, श्री.केशव घाटे , लिपिक,श्री.संदेश कदम , सहा.व्यवस्थापक या सर्वांचा सन्मानचिन्ह व बुके देऊन सत्कार करणेत आला.
या कार्यक्रमामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष व जॉइंट कमिशनर, जी एस टी. श्री.हाजी जतकर यांनी असोसिएशनचे उद्देश विषद करताना राष्ट्रीय एकात्मता व मानवी मूल्यांचे संवर्धन हे असून असोसिएशनच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला व भविष्यात करण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल उपयुक्त उपाययोजना सांगितल्या. याशिवाय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या Service to the Society is Service to the Nation या उक्तीप्रमाणे कार्य करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास मान्यवर मा.एजाज नकवी, मा.अजिज शेख, यांनी मनोगत व्यक्त केले.
या बैठकीमध्ये मा.ॲड.सलीम पटेल, नामवंत वकील, मा.अमजद पठाण, कॅन्सर तज्ञ, मा. नासीर बिराजदार, माजी कार्यकारी अभियंता, मा.जानमोहम्मद पठाण , माजी सहायक पोलिस आयुक्त, मा.कैसर अहमद , माजी सहायक पोलिस आयुक्त, मा.अब्दुल राऊफ वहाब, माजी सहायक विक्रीकर आयुक्त, मा. सूहेल खान, माजी कार्यकारी अभियंता सिडको, मा.डॉ.शमीम शेख, माजी सहायक पशुसंवर्धन आयुक्त, मा. मा. दस्तगीर मुल्ला, राजपत्रित स्टेनो, दिवाणी न्यायालय, (खजिनदार ), मा. असिर शेख, सहायक राज्यकर आयुक्त (चिटणीस), मा. आसमा सय्यद, सहायक राज्यकर आयुक्त, इम्रान नाईकवाडी, सहायक राज्यकर आयुक्त, श्री.समीर पेरामपल्ली, सहायक कार्यकारी अभियंता, मा.जावेद काझी, सहायक राज्यकर आयुक्त, मा.सय्यद जुबेर, माजी कार्यकारी अभियंता, म्हाडा, मा.मोइज शेख, माजी उपाधीक्षक, बी.एम.सी , मा.कय्युम कुरेशी, माजी विक्रीकर अधिकारी, मा.नासीर खान,अधीक्षक, मा .लियाकत शेख, राज्यकर निरीक्षक, मा. जुबेर सय्यद साहेब, राज्यकर निरीक्षक,बी.एम.सी. मा. तन्वीर मुजावर, सहायक कक्ष अधिकारी, मंत्रालय (सदस्य), मा. सादिक शेख, वरिष्ठ लिपिक, बी.एम. सी . मा. मोहम्मद जतकर, कर सहायक. मा. अकबर जतकर , लिपिक मंत्रालय , मा.शाकीर पटेल, शिपाई यांचेसह वेगवेगळ्या विभागातील २५० नामवंत, मान्यवर, अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा.सादिक शेख व मा. फारुख खाटीक यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले व आभार प्रदर्शन मा. नजीर शेख यांनी केले
बैठकीची सांगता राष्ट्रगीताने करणेत आली.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांनी शिरकुर्मा सह जेवणाचा आस्वाद घेतला.