महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) चे मुख्य आश्रयदाता व माजी विभाग प्रमुख जे.जे.रुग्णालय, मुबई मा.डॉ.सादिक पटेल साहेब यांची गुणश्री प्राध्यापक या सन्मानाच्या पदावर सन २०१८ ते २०२३ या ५ वर्षाच्या कालावधीकरिता नियुक्ती झाली होती व आता महाराष्ट्र शासनाने या पदावर मा.महोदय यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन ३ वर्षाची मुदत वाढ देऊन सलग ८ वर्षे गुणश्री प्राध्यापक या पदावर सन्मान दिला असून हा निश्चितच असोसिएशन साठी अभिमानाचा क्षण आहे.
मा.डॉ.सादिक पटेल साहेब यांना गुणश्री प्राध्यापक या पदाचा मिळालेला सन्मान लक्षात घेऊन त्यांचा सत्कार मा.आमदार कपिल पाटील साहेब, यांच्या हस्ते करणेत आला. याप्रसंगी मा.सरांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देणेत आल्या.
सत्काराला उत्तर देताना मा.डॉ.सादिक पटेल साहेब यांनी सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन शासनाने मला जी संधी व जबाबदारी दिली आहे त्याबद्द्ल मी शासनाचा ऋणी असून तळागाळातील प्रत्येक समाजाच्या वैद्यकीय प्रश्नासाठी मी कार्यरत राहीन असे मत व्यक्त केले.
या सत्कार प्रसंगी असोसिएशनचे पदाधिकारी श्री.सिराज शेख साहेब, माजी अधीक्षक अभियंता, मुंबई पोर्ट ट्रस्ट (मार्गदर्शक), श्री.हाजी जतकर, राज्यकर उपायुक्त ,वरिष्ठ श्रेणी (अध्यक्ष), श्री.मोहम्मद युसुफ निशाणदार, माजी कार्यकारी अभियंता, सिडको (उपाध्यक्ष), श्री.नजीर शेख, राज्यकर उपायुक्त (चिटणीस), श्री.यासीन मापारा, कार्यकारी अभियंता, सिडको (चिटणीस), श्री. पिरसाब अत्तार, विभागप्रमुख, व्हि.जे. टी.आय.इन्स्टिट्यूट (सदस्य), श्री.मेहमूद शेख, पदवीधर शिक्षक (सह खजिनदार ), डॉ.अझिम कुंदन, नामवंत डॉक्टर, (एम. डी , कमुनिटी मेडीसीन ), के.ई.एम. हॉस्पिटल हे उपस्थित होते.
याशिवाय या सत्कार प्रसंगी तळोजा एज्युकेशन व वेल्फेअर ट्रस्टचे पदाधिकारी व द्रोणगिरी कब्रस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.