मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी असोसिएशन (शासन मान्यता प्राप्त) यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी, जिल्हा ठाणे येथे महामंडळाचे अतिरिक्त कार्यालय सुरू करण्याचा कार्यक्रम आयोजित.

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी असोसिएशन (शासन मान्यता प्राप्त) यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी, जिल्हा ठाणे येथे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ यांचे अतिरिक्त कार्यालय सुरू करणेसाठी शुक्रवार दिनांक २३/०८/२०२४ रोजी कार्यक्रम आयोजित करणेत आला होता.ज्यायोगे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणे व गरजू व्यक्तीसाठी औद्योगिक कर्ज सुविधा सहजपणे उपलब्ध व्हावे असा शासनाचा मानस असून त्याचा लाभ मिळावा हा उद्देश होता.

या कार्यक्रमानिमित्त मा. अजीज शेख (आय. ए .एस.)आयुक्त, महानगरपालिका हे मुख्य अतिथी होते.

मा.हाजी जतकर , राज्यकर सह आयुक्त (जी.एस.टी.) व असोसिएशनचे अध्यक्ष तसेच मा.मोईन ताशिलदार , आयुक्त, अल्पसंख्याक मंत्रालय तथा उपसचिव, अल्पसंख्याक मंत्रालय हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.याशिवाय मा.गफार मगदूम , कार्यकारी संचालक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

सन्माननीय अतिथी म्हणून मा.इरफान भुरे , माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, ठाणे, मा.मोहम्मद युसुफ निशाणदार , माजी कार्यकारी अभियंता, सिडको, मा.अश्फाक शेख , माजी सहायक संचालक, नगररचना, मा.सुहेल खान , माजी कार्यकारी अभियंता, सिडको, मा.यासीन मापरा , अधीक्षक अभियंता, सिडको, मा.सलीम पटेल, नामवंत वकील, मा.डॉ. पिरसाब अत्तार , सहयोगी प्राध्यापक, व्हीं.जे.टी.आय., मा. हारून इनामदार , कार्यकारी अभियंता, महानगर पालिका, मा.डॉ.शबाना सय्यद मॅडम,वैद्यकीय अधिकारी, भिवंडी महानगर पालिका, मा. सरोश भुरे, मुख्याध्यापक, मा.फारुख खाटीक, पदवीधर शिक्षक हे उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी यांना शैक्षणिक कर्ज व गरजू व्यक्तींना औद्योगिक कर्ज कशा पद्धतीने मिळेल यावर मा.गफार मगदूम साहेब व श्री.शकील शेख , जिल्हा व्यवस्थापक, ठाणे जिल्हा यांनी खूप चांगल्या रीतीने मार्गदर्शन केले.याशिवाय उपस्थित व्यक्तींनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्यास समाधानकारक उत्तरे देणेत आली.

या कार्यक्रमासाठी मान्यवर, प्रत्येक शाळेचा प्रतिनिधी म्हणून व संस्थापक शिक्षक, पालक, विद्यार्थी असे एकूण २०० व्यक्ती उपस्थित होते.

या उपक्रमासाठी मा.शकील शेख यांनी त्यांचे कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून आभार मानले.

असोसिएशनचे भिवंडी तालुका समितीचे पदाधिकारी मा.प्राचार्य अब्दुल्ला शेख साहेब, मा.श्रीमती कैसर ढोले मॅडम, मा.फहीम मोमीन साहेब, मा.शकील शेख साहेब, संचालक, स्टार अकॅडमी, मा.हिलाल शेख साहेब, संचालक, स्टार अकॅडमी, मा.असिफ नाचन, चैरमन,अक्सा व अलनूर स्कूल ज्यू.कॉलेज, मा.प्राचार्य झियाऊर रेहमान, राईस हाय स्कूल व जुनियर कॉलेज प्राचार्य नौशाद,पटेल मसूद सिकंदर, हाय स्कूल व कॉलेज मा.प्राचार्य अस्लंम,शेख रेहमान शेख , मा.मुख्यघ्यापक जफर मुजावर, , मा.प्राचार्य फरिन शेख, मा.प्राचार्य अतिया मॅडम, मा.नेहाला मोमीन मॅडम, विभागप्रमुख, मा.प्राचार्य नोहिन खोत, मा.प्राचार्य तबसूम मॅडम यांनी या कार्यक्रमासाठी हाथभार लावला व अतिशय चांगले नियोजन केले होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.फारुख खाटीक व मा.फहीम मोमीन यांनी केले व आभार प्रदर्शन मा. सरोश भुरे यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.