आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की, रहिमतपूर मुस्लिम समाज यांच्याकडून काल रविवारी शाही मस्जिद रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा येथे मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकास व मुस्लिम समाजाकडून या बाबतीत योगदान या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराक्का पुणे जिल्हा सचिव श्री अब्दुलरज्जाक मुल्ला साहेब , इन्फोसिस पुणे मधील अभियंता श्री ताहीर मोलकर सर उपस्थित होते.
रहिमतपूर मुस्लिम समाज जिम्मेदार (अमीर साहब), मौलाना साहब, मस्जिद ट्रस्टी, परिसरातील मान्यवर तसेच तरुण वर्ग मोठया संख्येने उपस्थितीत होते.
या कार्यक्रमांमध्ये झालेल्या चर्चेनुसार पुढील उपक्रम इन्शाअल्लाह येत्या काही कालावधीमध्ये सर्वांच्या सहकार्याने करण्याचे नियोजित केलेले आहे.
रहिमतपूर तसेच परिसरातील सर्व मुस्लिम कुटुंबाची माहिती एकत्रित करून त्या माहितीच्या आधारे विविध वर्गवारी करणे, गरजू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तयारी केंद्र तसेच लायब्ररी सुरु करणे , शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे,विविध सामाजिक घटकासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे , व्यावसायिकांना एकत्रित आणून शासकीय योजनेच्या माध्यमातून त्यांची प्रगती करणे, समाजातील अपंग असलेल्या व्यक्तींचे अपंग प्रमाणपत्र काढण्यास सहकार्य करणे, मुलींसाठी तसेच महिला वर्गांसाठी विविध उपक्रम राबविणे, पुढील काही वर्षात रहिमतपूर तसेच परिसरातील मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराक्का सदस्यांच्या सहकार्याने कालबद्ध विकासासाठीचा प्लॅन बनविणे.
मुस्लिम जमात रहिमतपूर चे अमीर साहब, मौलाना साहब, सामाजिक कार्यकर्ते बबलू भाई, मस्जिद ट्रस्टी व मुस्लिम समाज रहिमतपूरचे मान्यवर व सदस्यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नाप्रमाणे आपण देखील आपल्या परिसरासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून येत्या काही वर्षात आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या समाजाचा निश्चितच विकास होऊ शकतो.