विचार मंथन बैठक

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी अससोसिएशन च्या वतीने विचार मंथन बैठक दिनांक १ मे २०१९ रोजी टाऊन प्लॅनर असोसिएशन हाल, सी.बी.डी.बेलापूर, नवी मुंबई येथे मा.डॉ. सादिक पटेल साहेब, मा.एजाज नक्वी साहेब, मा.नसीमा शेख मॅडम व मा.डॉ. डेव्हिड अल्वारिस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या बैठकीसाठी मा.ऍड. राहमतूल्लाह मोमीन साहेब हे उपस्थित होते.

बैठकीच्या सुरवातीस असोसिएशनची प्रतिमारूपी मार्गदर्शक पुस्तिका व डायरी २०१९ चे प्रकाशन उपस्थित मान्यवर व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

पहिल्या सत्रात संघटनेच्या सदस्य व पदाधिकारी यांच्या प्रश्नाबाबत मा.सुमित मल्लिक साहेब यांनी मुख्य सचिव पदावर कार्यरत असताना निर्गमित केलेल्या परिपत्रकास अनुसरून कार्य करणे व त्यासाठी समिती गठीत करणे, अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या योजनांबाबत जनजागृती करणे, विभागीय समितीची स्थापना करणे व विभागीय समितीचे अध्यक्ष या नात्याने जबाबदारी देणे, यामध्ये डॉ. डेव्हिड अल्वारिस साहेब, श्री अझीज शेख साहेब, श्री सलीम शेख साहेब, श्री रजा खान साहेब, श्रीमाती अमींना शेख मॅडम, श्री मोहम्मद युसूफ निशानदार साहेब,श्री एजाज उल्लाह खान साहेब, श्री मस्सीउद्दिन सय्यद साहेब या उपाध्यक्षांचा ६ विभागीय समितीवर अध्यक्ष तथा संपर्क प्रमुख या नात्याने प्रभावीपणे काम पाहतील असे ठरले . बहुजन हिताय संघाबरोबर बैठका आयोजित करणे, संपूर्ण राज्यात दौरे करणे , संघटनेच्या प्रभावी कार्यासाठी अधिकाराचे व कामाचे विकेंद्रीकरण करणे इ. मुद्द्यांवर चर्चा होऊन त्यासाठी वेगवेगळ्या पदाधिकारी यांच्या समित्या गठीत करण्यात आल्या

जेवणानंतर दुसऱ्या सत्रात सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली यामध्ये आश्रयदाते मा.डॉ सादिक पटेल साहेब, मा.डॉ. मकसूद खान साहेब, मा.एजाज नक्वी साहेब, मा.रवींद्र चव्हाण साहेब, मा.श्रीमती नसीमा शेख मॅडम,मा.महावीर पेंढारी साहेब,मा.डॉ. नागसेन रामराजे साहेब हे मुख्य मार्गदर्शक, कायदा मार्गदर्शक ऍड. राहतूल्लाह मोमीन साहेब, ऍड. सलीम पटेल साहेब, अध्यक्ष श्री हाजी जतकर व सदस्य सचिव श्री यासिन मापरा यांची समिती गठीत करण्यात आली .

याशिवाय राज्याची नियंत्रण समिती १५ ते १७ पदाधिकाऱ्यांची गठीत करण्यात आली.
यामध्ये श्री हाजी जतकर, अध्यक्ष, डॉ. डेव्हिड अल्वारिस साहेब, श्री अझीज शेख साहेब, श्री.सलीम शेख साहेब, श्री मोहंमद युसूफ निशनदार साहेब (सर्व उपाध्यक्ष) श्री अश्फाक शेख साहेब, सरचिटणीस. श्री मनोजकुमार शेटे साहेब, श्री यासिन मापारा साहेब, श्री गुलाम नबी शेख साहेब (सर्व चिटणीस), श्री दस्तगीर मुल्ला साहेब, खजिनदार , श्री सुहेल खान साहेब, श्री नजीर शेख साहेब (सर्व सह खजिनदार ) श्री तन्वीर सय्यद, श्री ओवेस मोमीन ,श्री सलीम मुलाणी, श्री हैदर शेख (सर्व सदस्य)

सल्लागार समिति ३ महिन्यातून एकदा बैठक नियंत्रण समिती बरोबर बैठक करेल व नियंत्रण समितीची बैठक २ महिन्यातून होईल व या बैठकीचा वृत्तांत नियंत्रण समिती सल्लागार समितीपुढे ठेवेल.
याशिवाय राज्य समिती व जिल्हा समिती च्य नियमित बैठक करणे,
संघटनेच्या उपक्रमासाठी निधी संकलन करणे व त्यासाठी समिती स्थापन करणे. संघटनेसाठी कार्यालय व बहुउद्देशीय इमारत चालविण्यासाठी घेणे, अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी यांची पतपेढी चालवणे, निवृत्त अधिकारी कर्मचारी व सेवाभावी संस्था यांच्याशी समन्वय साधून काम करणे ई. बाबीवर सकारात्मक चर्चा करून समित्या गठीत कऱण्यात आल्या.

ही विचारमंथन बैठक आयोजित करणेसाठी श्री अशफाक शेख साहेब व श्री ओवेस मोमीन साहेब यांनी सकारात्मक पुढाकार घेतल्यामुळे ही बैठक यशस्वी झाली. अशाच प्रकारे राज्यस्तरावर व प्रत्येक जिल्ह्यात असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी असे उपक्रम घेणेसाठी पुढाकार घेतल्यास त्या पदाधिकाऱ्यांच्यात नेतृत्व गुण निर्माण होतील जी गोष्ट आपल्या समाजासाठी नितांत आवश्यक आहे.

या बैठकीमध्ये श्री समीर पेरामपल्ली, सहायक कार्यकारी अभियंता, सिडको व श्री अब्दुल जब्बार शेख, वरिष्ठ लिपिक, वक्फ बोर्ड, औरंगाबाद यांनी आजीवन सदस्य होणेसाठी धनादेश/ रक्कम रु.५०००/- प्रत्येकी मा. डॉ. सादिक पटेल साहेब यांच्याकडे सुपूर्द केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

डॉ. शमीम शेख साहेब, सहायक पशुसंवर्धन आयुक्त व राज्य सदस्य तथा अससोसिएशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष हे सेवेतून यशस्वी निवृत्त झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करणेत आला.

या विचारमंथन बैठकीसाठी विभाग, पुणे जिल्हा येथून ४० अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

लवकरच या विचार मंथन बैठकीचे कार्य वृत्तांत (मिनिट्स) निर्गमित करणेत येतील.