अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा

Diwali Greetings 2017
November 21, 2017
सत्कार समारंभ व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर २०-१-२०१९
January 20, 2019

अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा

अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा

मराक्का : पुणे शाखेचे आयोजन

*पुणे* : ‘शिक्षण’ हेच अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे गमक आहे, त्यासाठी युवकांनी ध्येय निश्चित करून अथक परिश्रम केले पाहिजे असे प्रतिपादन *यशदाचे माजी संचालक रविंद्र चव्हाण* यांनी येथे व्यक्त केले.

*महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशन -पुणे शाखा* यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अल्पसंख्याक हक्क दिन ‘  कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. पुणे जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी सभागृहात (जुनी ईमारत ) है कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

श्री चव्हाण पुढे म्हणाले की अल्पसंख्यांक समाजातील युवकांनी स्वयं:प्रकाशीत होणे गरजेचे आहे. भावी पिढी घडविण्यासाठी
संघटनेच्या सर्व सदस्यांनी कार्यरत रहावे. समाजासाठी अधिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अधिकार्‍यांनी कार्यरत रहावे.

असोसिएशनच्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष तथा जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता *नासीर बिराजदार*  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले भविष्यात असोसिएशनची संघटन बांधणीकडे लक्ष केंद्रित केले जाईल. शासकीय योजना सामान्य व्यक्तिपर्यन्त  त्या पोहोचल्या पाहिजेत.

याप्रसंगी निवृत्त जिल्हा न्यायाधीश जमील शेख, शिक्षणाधिकारी हारुन आतार, शिक्षणाधिकारी श्री.मोरे , पुणे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी दिपक माळी , कार्यकारी अभियंता, जलसंसाधन श्री. शाहिद काजी, जिल्हा माहिती अधिकारी सौ. पाटील, तहसीलदार सौ.लैला शेख , पुणे महानगरपालिकाचे सहा.आयुक्त युनूस पठाण, निवृत्त गट विकास अधिकारी इसरार पठाण साहेब, उपअभियंता सौ. शहापूरे डॉ. शमीम शेख, व्याख्याते मेहबूब काझी, नदीम काझी, अब्दुलरज्जाक मुल्ला, व खेड तालुक्यातील पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते.

निवृत्त जिल्हा न्यायाधीश *जमील शेख* यांनी अल्पसंख्याक नागरिकांचे संविधानात्मक हक्क व अधिकार याची माहिती दिली. तसेच संघटनेसाठी कायदेविषयक मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली.

नदीम काझी यांनी मनोरंजक खेळाद्वारे सकारात्मक जीवन जगण्याचे तंत्र सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते मेहबूब काझी यांनी शासनाच्या अल्पसंख्याकांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी शिक्षणाधिकारी श्री.मोरे यांचेही भाषण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक लतीफ शाह यांनी केले. आभारप्रदर्शन  सूरज कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
************************************
*वृत्तांकन* :
लतीफ शाह, महेबूब काजी

ठिकाण : महात्मा गांधी सभागृह, पुणे जिल्हा परिषद, (जुनी इमारत), पुणे.

अल्पसंख्यांक हक्क दिनाची क्षणचित्रे